माझी भटकंती मैत्री टूर बडोदा भाग क्र.८६





☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂
माझी भटकंती
       मैत्री टूर
क्रमशः भाग-८६

  बडोदा ( वटोदरा )
दुसरा दिवस सन १९९७

➿〰️➿〰️➿〰️➿
  हायवेकडील एका धाब्यावर मस्तपैकी शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतला. बडोदा (वटोदरा) शहराकडे फिरायला निघालो.बडोदा ऐतिहासिक वारसा लाभलेले  शहर .बडोदा संस्थानचे राजधानीचे शहर.महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे संस्थान.महाराज द्रष्टे राज्यकर्ते होते.त्याकाळात शिक्षण,कला आणि स्थापत्य यांना उत्तेजन व राजाश्रय देणारे संस्थानिक राजे होते.
भारतरत्न क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी त्यांनी स्काॅलरशिप मंजूर करून आर्थिक मदतीचा हात दिला होता.इथे बऱ्यापैकी मराठी लोकवस्ती आढळते.कला व सांस्कृतिक नगरी म्हणूनही या शहराचा लौकिक आहे.
त्यामुळे येथील अनेक वास्तू प्रेक्षणिय आहेत.
    सायंकाळ होत आली होती. आम्ही प्रथम बडोदा संस्थानचे संग्रहालय व आर्ट गॅलरी पहायला गेलो.दालनातील मनोवेधक वस्तू पाहताना आपण इतिहासात हरवून जातो.रममाण होतो. संग्रहालय म्हटले की तिथं नानाविध  दुर्मिळ ,अस्सल आणि मौल्यवान  वस्तूंचा अनमोल ठेवा प्रदर्शनिय असतो...तिथं आकर्षक गालिचे,खेळणी, चित्राकृती,
भांडी, पेहराव, पेंटिंग्ज आहेत.विशेष करून इजिप्तिशियन ममी आणि बेबी ब्ल्यू व्हेल माश्याची कलाकृती पहायला आवर्जून हौशी पर्यटक येतात.या आर्ट  गॅलरी सभोवती प्रेक्षणिय  'सयाजी बाग' आहे.प्राणी व पक्षी संग्रहालय आहे. दाट झाडी,मनमोहक कारंजी आणि वृक्षवेलींची रचना आपले लक्ष वेधून घेतात.बागेतील अनेक ठिकाणी विविध पोजमध्ये फोटोसेशन केले. ग्रुपचा,वैयक्तिक फोटो काढले.फिरुन आम्ही दातृत्वाची साक्ष देणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या वैभवशाली ऐतिहासिक वास्तू पहायला निघालो.बडोद्यात भ्रमंती करताना ही वास्तू आपले लक्ष वेधून घेते."लक्ष्मी-विलास" पॅलेस,स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट शैलीतील राजवाड्याची देखणी वास्तू बघायला मिळली.समाधान लाभले.या वास्तूतील शस्त्र संग्रहालय व राजा रविवर्मा यांच्या चित्रांचा संग्रह ही दालने लक्षवेधी आहेत.वास्तूची नक्षीदार भिंती,रंगीत काचेची तावदाने आणि कलात्मक छत पाहून  ऐश्र्वर्य संपन्नशाली संस्थानची महती समजते.तिन्हीसांजेला पॅलेसचे नयनमनोहरी देखणं रुप दिसतं होते. मस्तपैकी कॅमेऱ्याने फोटोग्राफी केली.तदनंतर आम्ही अहमदाबाद कडे निघालो....

        🌀बडोदा ते अहमदाबाद प्रवास
बडोद्यावरुन आम्ही हायवेने गुजरातच्या अहमदाबाद शहराकडे प्रस्थान करत होतो. औद्योगिक आणि व्यापारी शहरांमुळे हायवेला वाहतुकीमुळे ट्रॅफिक जॅम होत होती.मोठा रस्ता असूनही प्रचंड गर्दी होती.
रात्रीचे नऊ-साडेनउची वेळ झाली होती.सर्वानुमते आता धाब्यावर जेवणासाठी गाडी थांबवण्याची सूचना ड्रायव्हरला केली.थोड्या वेळाने एका धाब्यावर गाडी थांबवली.वॉश घेवून शाकाहारी जेवणाच्या मेनूची ऑडर दिली.धाब्यावर काथ्याने विणलेल्या खाटेवर (चारपाई) निवांत पणे बसलो होतो. आजही रात्रीचा बारा ते एक पर्यंत प्रवास करुन एखाद्या पंपावर थांबून पहाटे पहाटे साबरमती नदी वर जावू.याच्या चर्चा करत असतांनाच गरमागरम रोटी त्यावर तूप लावलेले,डाल फ्राय आणि काजू मसाला असा मेनू होता.वेटरने प्लेटमध्ये पदार्थ वाढले.
आमचं जेवण सुरू झाले.तदनंतर थोडावेळ तिथेच घुटमळून आमचा रात्रीचा प्रवास सुरू झाला. दोन-तीन तास प्रवासानंतर एका पेट्रोलपंपावर आम्ही मुक्काम केला.. काहीजणांनी गाडीत,काहींनी तिथेच योग्य जागा बघून निद्रादेवीच्या अधीन झालो.
क्रमशः भाग क्रमांक ८६

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com



प्रतिक्रिया

*लटिंगे सर!*

अपरिचित स्थळांविषयीची माहिती नेमक्या शब्दांत!
*आता वेध शतकाचे!*

श्री सुनील शेडगे पत्रकार
सातारा

बडोद्याच्या रेल्वेस्थानकावर रात्री दीड वाजता गाडी दोन मिनिटांसाठी थांबली होती. 'महाराजा सयाजीराव गायकवाड प्रजाहितदक्ष आणि मानवता मूल्यांचा रक्षक राजा' त्यांना अभिवादन करायचे म्हणून मी आवर्जून खाली उतरलो आणि स्थानकावर तिथे पावन भूमीला नतमस्तक होऊन वंदन केले. आजही माझ्या डोळ्यांच्या कडा कृतज्ञतेने ओल्या झाल्या आहेत.
बडोद्याचा उल्लेख लेखात वाचून मी ही तीन वर्षांपूर्वीची माझी आठवण जोडत आहे!🌹💐🙏🙏
श्री महादेव भोकरे सर
खटाव

*आदरणीय लटींगे सर आपण आम्हाला खरच आपल्या भटकंती ने वेड केलय ,*
       *अतिशय उत्तम फोटोग्राफी सोबत बहारदार वर्णन , घरबसल्या वेगवेगळ्या ठिकाणचं दर्शन रोज घडवता.*
     *अतिशय साध सुट सुटीत व्यक्तिमत्त्व आपल मला खरच खूप भावल , कोणताही अभिनिवेश नाही ,अगदी सहज सोपं अस जे कोणालाही भावल अस काही तरी आहात आपण*
      *आपल्या भटकंतीस आणि आपल्या प्रवासवर्णन प्रवासास माझ्या मनस्वी खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏*
श्री संतोष ढेबे, सर  महाबळेश्वर

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड