निसर्ग सौंदर्य आठवणीतला पाऊस ३०
आठवणीतील पाऊस
नभीचे मेघ कोसळले
धरणीला ओलेचिंब केले
वाऱ्याने वृक्ष उन्मळले
रानी वनी गवत पसरले||
डोंगर,झाडी हिरवाईनं नटले
जलाभिषेकाने राऊळ सजले
सुसाट घोंगावत येई वारा
तिरक्या रेघोट्यात जलधारा ||
व्हरांड्यात झालं जलशिंपण
चिखलाने बरबटलेले अंगण
शेतातल्या मातीनं केलं वंदन
धनधान्याचे होईल नंदनवन ||
सरीवर सरी मायंदाळ आक्रंदला
डोळे पाणावले........
सरीवर हरी संततधार नाचला
सरीवर हरी संततधार नाचला
नयन आनंदले......||
पावसाची बरसात कुणा रडविते
पावसाची बरसात कुणा हसविते
पावसाची बरसात कुणा रडविते
पावसाची बरसात कुणा हसविते
चराचराचे जीवन फुलविते
जीवन बहारदार करते ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३०
प्रतिक्रिया
पावसाचे सुंदर वर्णन..!
छान वर्णन .. Nice Poem.
पावसाचा फोटो पाहून नीळकंठ मास्तर मधील " अधीर मन झाले..." गीताची आठवण झाली
श्री अनिल पवार सर, सातारा
शाळा व मंदिर निसर्गरम्य सुंदर परिसर 👌👌👌
श्री सुरेन्द्र पारखे साहेब ,वाई
Comments
Post a Comment