माझी भटकंती मैत्री टूर पुर्वरंग क्रमशःभाग क्र.८४
🌿💫💫🌿💫🌿💫
माझी भटकंती
🚘 मैत्री टूर 🚘
साठवणीतल्या आठवणी
क्रमशः भाग-८४
सन १९९७
माझी भटकंती
🚘 मैत्री टूर 🚘
साठवणीतल्या आठवणी
क्रमशः भाग-८४
सन १९९७
🛣️पूर्वतयारी व प्रवास
➿➿➿➿➿➿➿➿➿
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रिवार्षिक अधिवेशन जळगाव येथे आयोजित केले होते. तिथं प्राथमिक शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी शिक्षकांचे दैवत माननीय शिवाजीराव पाटील (आण्णा) यांच्या नेतृत्वाखाली महाअधिवेशनासाठी राज्यातील तमाम प्राथमिक शिक्षक सहभागी होणार होते.यास्तव महाराष्ट्र शासनाने ऑनड्युटी खास रजा दिली होती.. हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन सुरू होते.. अधिवेशन स्थळी जाण्यापूर्वी
अगोदरच्या अथवा परतीच्या दिवसांचे सहलीचे नियोजन सुरू होते.कोणत्या रुटने काय काय पहायला येईल..दिल्ली दर्शन,उत्तर भारत,कोकण,मध्यप्रदेश नागपूर, इत्यादी रुटची चर्चा सुरू होती...मग आमच्या पश्र्चिम भागातील शाळेत असणाऱ्या शिक्षकमित्रांसोबत आमचे गुजरात राजस्थान व मध्यप्रदेश भटकंती करुन जळगांवला कसं यायचं हे ठरवत होतो.. तेव्हा मोबाईल सुविधा नव्हती त्यामुळे प्रत्यक्ष भेटूनच नियोजन करायला लागायचे....आमचे मित्र श्री संभाजी जाधव,श्री बाळकृष्ण पंडीत,श्री भास्कर पोतदार आणि श्री विजय नाळे आणि श्री दिलीप जाधव या वाईतील मित्रांनी गाडी ठरविली होती. जाण्याचा आदल्या दिवशी दुपारी फायनल झाले.मला व श्री हणमंत फरांदे सरांना सकाळी दहाच्या दरम्यान गावातच आवरुन बसायला सांगितले .आणि प्रशांत चव्हाण सरांना सुरुरला घरीच आवरुन बसायला सांगितले.
पहिल्यांदाच खाजगी वहानाने परराज्यात शिक्षकमित्रांसमवेत फिरायला निघालो होतो.वडिलांना अधिवेशनाला शिक्षकांना जायला खास रजा मिळते हे माहित होतं.फक्त कुठे फिरायला जातील हे माहीत नव्हते.जाण्यापूर्वी कुटूंब प्रमुख आई वडिल असल्याने सहलीची परवानगी घेतली. सौभाग्यवतीशी सहलीची चर्चा रजा मिळायच्या अगोदरपासून चालू होती. फक्त एकटे का जोडीने जायचं हे फायनल होत नव्हते..शिक्षक बॅंक अधिवेशनाला जायला खास कर्जही उपलब्ध करून द्यायची..मी ही त्यावेळी कर्ज काढून फिरायला निघालो होतो.
आदल्या रात्रीच आवराआवर केली होती.गरजेचे साहित्य घेतलं होतं.प्रवासात ऐनवेळी भूक लागली तर खाण्यासाठी आई आणि पत्नीने घरीच तहानलाडू भुकलाडूचा फराळ तयार केला होता..
ट्रीपला जायचा दिवस उगवला आजपासून परराज्यात फिरायला निघालो होतो.. लवकरच जेवण उरकून सतत घड्याळाकडे बघत होतो... नित्योपयोगी साहित्य,पैसे आणि कपडे बॅगेत ठेवले.घरातील सर्वांचा निरोप घेतला... आईला वंदन केले.पत्नीचा ,मुलांचा आणि घरातील इतरांचा निरोप घेतला.आणि दहा-साडेदहाच्या दरम्यान चव्हाणाच्या हाॅटेलजवळ येऊन थांबलो.वाईवरुन येणाऱ्या गाडीची वाट बघत बसलो..ओळखीचे विचारपूस करत होते.गुरुजी कुठं दौऱ्यावर निघालायस का? सहलीला निघालाय का दोस्तांबरोबर का अधिवेशनाला ??नाना प्रश्र्नांची सरबत्ती सुरू होती.माझं एकच उत्तर' जळगांवला अधिवेशनाला आणि सहलीला निघालोय....'
अकरा- बाराच्या दरम्यान वाई वरुन चलो अधिवेशन बोर्ड लावून गाडी आली... गाडी थांबवल्यावर मागच्या सीटवर बसलो.. तदनंतर पाटाच्या पुढं श्री हणमंत फरांदे सर सहभागी झाले.... हायवेला आले..सुरुरला प्रशांत चव्हाण सर सहभागी झाले.... ठरलेल्या पैकी सगळे आले होते...... आता खऱ्याअर्थाने आम्ही फिरायला निघालो......हायवेने खंडाळा पुणे मुंबई ठाणे मार्गाने आमचा प्रवास गुजरातकडे सुरू झाला..
क्रमशः भाग---८४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
.
क्रमशः भाग--८४
Comments
Post a Comment