माझी भटकंती मैत्री टूर उदयपूर भाग क्र.९१
🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃
माझी भटकंती
क्रमशः भाग-९१
🤝मैत्री टूर🤝
क्रमशः भाग-९१
सन १९९७, पाचवा दिवस
🔆उदयपूर पर्यटन🍁
♾️➖♾️➖♾️➖♾️♾️➖♾️➖♾️➖♾️
उन्हअंगावर घेत निवांतपणे एकेकाला जाग येत होती. आवराआवर करायला सुरुवात व्हायची होती.पण दोन्ही रुममध्ये पाण्याचा पत्ता नव्हता.पाणीगेलेलं..दोन-तीन वेळा मॅनेजरला फोन केला तरी रुमबाय काय आला नाही. वैतागलो होतो सगळेजण. पाणी येईपर्यंत गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.जाधव सरांनी मॅनेजरचा चांगलाच समाचार घेतला.तांत्रिक बिघाडामुळे पाणी येत नव्हते. बऱ्याच वेळाने पाणी आले.नंतर समजले तांत्रिक बिघाडझाला होता.तोवर आमच्या तोंडचं पाणी पळाले होते.मग कसेतरी थंड पाण्याने स्नान उरकले. मी आणि जाधव सर शेव्हिंग करायला बाहेर पडलो.सलून शोधायला लागलो.पाच एक मिनीटांच्या अंतरावर एक सलून आढळले.लगेचच नंबर लागला.शेव्ह करायची म्हणून बोललो.खुर्चीत बसलो.त्याने फोम लावून शेव्ह केली. कसबी कारागीर होता. घोटून शेव्ह झाली की त्याने फेस मसाज करनेका है क्या ? मला 'विचारले ,मी ही लगेचच होकार दिला.मग त्याने एक स्क्रीम चेहऱ्यावर लावून लाईट वरील मसाज मशीनने चेहऱ्यावर फिरवू लागला.मशीनच्या स्पर्शाने गुदगुल्या होत होत्या.तसल्या मसाजचा पहिलाच अनुभव .मग त्याने गरम वाफेने चेहरा स्वच्छ केला.मस्तच फ्रेश वाटत होतं.केसही सेट केले.चेहऱ्यावर चांगलीच झळाळी आल्याचे जाधव सर बोलले,'मस्तच लुक'.'कितना हुआ ',बील विचारले 'पचास रुपये ',त्याने पटकन सांगितले.'शेव्हिंग,मसाज और स्टीम इतने सबके पचास हुये.'असा हिशोब सांगितला.मी ही इतना हुआऽऽ म्हणत पन्नासची नोट काढून त्याला दिली.(आपण दराची विचारणा केली नाही ही आपलीच चूक आहे.) हे बघून सरांनी फक्त शेव्हिंगच कर असे त्याला अगोदरच सांगितले. आज त्याने चेहऱ्याचे सौंदर्य चांगले खुलावले.एक नवा अनुभव मिळाला.अनोळखी ठिकाणी काहीही करण्यापूर्वी दरपत्रक पहावे अथवा दर विचारावा.
मित्राची शेव्ह झाल्यावर मग आम्ही दोघं लॉजवर आलो.
सगळं आवराआवर करून लॉज सोडले.एका हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे नाष्टा आणि चहापान केला. सगळे चेहऱ्याचा दिलखुलास लुक बघून मस्तच कौतुक करत होते.फोटोही काढला. तेव्हा जाधव सर गालातल्या गालात हसून दाद देत होते.सर्वानुमते उदयपूर मधील प्रेक्षणिय, महत्त्वाच्या ठिकाणांची भेट सुरळित व्हावी म्हणून गाईड केला. तदनंतर उदयपूर फिरायला निघालो.गाईड आमच्याशी हिंदीत बातचित करत होता.या शहराचा ऐतिहासिक संस्थानचा लौकिक सांगत होता. जणू काही गाडीत आमचा इतिहासाचा पिरीयड चालला होता. छानच कथन करत होता...
आकर्षण महाल , सुंदर उद्याने आणि निसर्ग रम्य झील बघताना त्याकाळच्या रईस आणि शाही संस्थानची ओळख अधोरेखित होते. तलावांचे शहर म्हणूनही या शहराची ओळख आहे.त्याने आम्हाला दहा एक स्थळांची माहिती दिली.त्यापैकी प्रमुख आणि फेमस चार-पाच ठिकाणं दाखवायला त्याला सांगितले.पहिल्यांदा आम्ही सिटी पॅलेस पहायला आलो.महाराजा उदयसिंह यांनी हे शहर वसविले होते म्हणून शहराचे नांव उदयपूर आहे. अशी माहिती गाईडने सांगितली.उदयपूरचे मुख्य आकर्षण.प्रशस्त वास्तू स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना बघायला मिळाला. वास्तू बघितलीकी ऐश्र्वर्यसंपन्न संस्थानाची ओळख होते.या पॅलेसमध्ये विविध वस्तूंचे,शाही पेहरावांचे आणि शस्त्रात्रांचे संग्रहालय आहे. शाही पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यासाठी खास शाही गाड्याही तिथं आहेत..
तदनंतर आम्ही शौर्य आणि महापराक्रमी राजे महाराणा प्रताप यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. गाईडने महाराणा प्रताप यांचा गौरवशाली इतिहासाची ओळख करून दिली.इथल्या आठवणींचे क्षण कॅमेऱ्याने टिपत होतो अन् ऐतिहासिक आठवणी हृदयात जपून ठेवत होतो.तेथील कारंज्यांची खासीयत असणाऱ्या मनमोहक उद्यानाला भेट दिली.मस्तपैकी छायाचित्रे काढली. बागेतील फुलझाडे,कारंजे आणि झाडवेलींच्या रचना पाहून आपण रममाण होऊन जातो.
"लेक पॅलेस " पिचोला सरोवराच्या मध्यभागी बांधलेला आहे.आत जाण्यासाठी बोटिंग व्यवस्था केलेली आहे. सध्या हा महाल 'हेरिटेज दर्जा' प्राप्त हॉटेल आहे.भिंती कलात्मक पेंटिंग्जने रेखाटल्या आहेत.
छतावर नक्षीकाम केलेले आहे.महालाच्या वास्तुकेलेचे ऐश्वर्यसंपन्न सौंदर्य नजरेत भरणारे आहे. ही ऐतिहासिक संस्थानातील प्रेक्षणिय पर्यटनस्थळे आणि वास्तू सतत पहावीत एवढी उत्कंठा वाढवतात.भारतीय संस्कृतीत लोककला आणि शिक्षण यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी असणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे सीसीआरटी सांस्कृतिक स्त्रोत एवं प्रशिक्षण केंद्रही उदयपूर जवळच आहे.बरेच शिक्षक मित्र या प्रशिक्षणाचा लाभ घेतात.भेटूया उद्या महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या चितोडगडावर तोपर्यंत नमस्कार...
〰️〰️〰️〰️〰️〰️💫
क्रमशः भाग-९१
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे ,वाई
https //raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment