निसर्ग सौंदर्य कविता पाऊस ३७



         पाऊस

अंबरी काळेभोर मेघ आले
दिनकराला ढगाने झाकले
ढगाळ वातावरण झाले
धुक्याचे पुंजके दाटले ||

थेंबथेंब बुरंगाट पडले
थेंब काचेवर  टिपकले
ढगांनी अत्तर फवारले
 मृदेचा सुगंध दरवळे ||

गंधाने मन मोहरले
वाटेला ओले केले   
घाटाची वाट वळणाची
डोंगरकडयाच्या कुशीची ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३७

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड