निसर्ग सौंदर्य कविता आखेगणी १५





            निसर्ग
काही गावे सह्याद्रीच्या कडेवरी
काही वसती माथ्यावरी
काही असती पायथ्याशी
संगत त्यांची वनांशी!!

डोंगरराईच्या परिसरात
देवराईच्या सहवासात
धरणबंधाऱ्याच्या सानिध्यात
थंडगार झुुुुुुुुळकीच्या वाऱ्यात !!

पर्जंन्याच्या वर्षावात
शुद्ध हवेच्या सहवासात....
शिवारशेती फुलवतात
सुखासमाधानाने नांदतात!!

कधीतरी उठलेल्या श्वापदाच्या भितीखाली 
दिनरात तणावात असतात
भितीच्या गाठोड्याला दाबून पायाखाली 
आपली दिनचर्या सुरू करतात!!





छायाचित्र आखेगणी परिसर

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड