निसर्ग सौंदर्य पावसाळी वाट कविता ३९




     पावसाळी वाट

एकसंघ काजळाचे आभाळ
मेघ झाले फार खट्याळ
संततधारा कोसळती
झाडामधूनी टिपकती

पाणी उताराला पळाले
वाटेत डबक्याला मिळाले
सडक ओलिचिंब झाली
जोरात वर्षावाने उखडली

सभोवताली हिरवा बहार
बरसात झाली सवार
सडकेची छटा काळसर
वळणाची वाट वेधते नजर

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

काव्य पुष्प ३९

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड