निसर्ग सौंदर्य कविता कास पठार २१


         

      निसर्ग सौंदर्य
हिरवागर्द शालू, मखमली दुलई
धवल गुलाबी नक्षी गोलाई |
कास पठार सौंदर्याची खाण.....
फुलोऱ्यांची दिमाखदार शान |
फुलोत्सवाची नजाकत भारी
रुप दिसती देखणं पठारावरी |
 शोभिवंत कांती वसुंधरेची
मनमोहक छटा आकाशाची|
सृष्टीची ही रंगीत छटा,उत्कंठा   
वाढविते ....
रानपुष्पांचे सौंदर्य,मनी भूरळ घालते|

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड