निसर्ग सौंदर्य कविता धरण परिसर ३१





🍁धरण परिसराचे दृश्य🍁

हिरवी पिवळी गवतपाती
गर्द  हिरवी  शेतीभाती
झाडे वेलींचे तोरण सजती
नजारा बघूनी मन बावरती ||

धरणाचे रुप मनोहारी दिसती                 
पायथ्याला जलाभिषेक करती
गावातल्या घरांच्या ओळी
 भासे नक्षीदार रांगोळी ||

सोनेरी शालूवर पदर हिरवा
कौलारू ठिपक्यांची नक्षी सुंदरा
निळसर छटेचा काठकिनारा
 सूर्यप्रकाशात चमकतीय धरा||

डोंगरांची आभाळमाया
वसुंधरेची अनमोल काया
कड्यातूनी दिसं नजारा सुंदर
करूया निसर्ग सौंदर्याचा आदर ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड