काव्य पुष्प-४० नागपंचमी कविता



🐍 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा❗ 🐍
➖➖➖➖➖➖➖
            


        नागपंचमी
श्रावणातला पाऊस बरसला
शिवाराला तजेला आला
उनपावसाने खेळ मांडला
तिथं उन तर इथं बरसला

क्षितीजावरती उन पडले
इंद्रधनुचे तोरण झळकले
उन्हात जलबिंदू चमकले
निसर्गाचं सौंदर्य खुलले

वारुळ पूजन्या जाती सयाबाया
रानावनातल्या नागाला पूजाया
दुध लाह्या वस्र हार फुलं वहाया
सगळ्यांच्या सुखाची आर्जव कराया

सणासुदीचं गोडधोड बनवूया
दिंडं गुळपोळ्या करुया
पंगतीनं जेवायला बसूया
आग्रहाने जेवण वाढूया

  झिम्मा, फेरधरुनी नाचूया
  भावाच कवतिक करुया
  रक्षण करायला भाऊराया
  सुखात ठेव त्याला देवराया

बालगोपाळांनी बांधलाय झुला
आनंदाने  झोके घेऊ चला
सुखात ठेव देवा सासर माहेराला
शेतीभाती पीकू दे ही विनंती तुला

सुवासिनीला सय माहेराची आली
 झिम्मा फुगडीची आठवण झाली
 नागराजाची नागपंचमी आली
सजीवसृष्टी हर्षभरीत झाली...
काव्य पुष्प ४०

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड