निसर्ग सौंदर्य धबधबे कविता ४३



निसर्ग सौंदर्य
धबधबे
कड्यातून धबधबे वाहती
जलधारा कोसळती
दुग्धाभिषेक करती
दुधाळ फवारे उडती||

जलधारा उसळती कड्यावरी
साखरनळ्या नजरेत भरी
सृष्टी नटली रुपात भरजरी
जलप्रपाताचे कोंदण भारी ||

पानापानातून थेंब झरती
वसुंधरेला चिंब भिजविती
वडापगाडी थांब्यावरती
प्रवाशांची वाट बघती ||

शाळेसभोवती हिरवं लेणं
अनामिकांना आनंद देणं
 कौतुकाने नजराणा बघणं
आपसूक ओठावर शब्द येणं ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ४३

यापुर्वाचे सर्व लेख व कविता वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड