माझी भटकंती मालिकेवर श्री सुनील शेडगे पत्रकार यांचा लेख





🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   *मुसाफिर*

*सुनील शेडगे। नागठाणे ता. सातारा*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

'उपक्रमशील शिक्षक' गटाचे आधारस्तंभ आदरणीय रवींद्र लटिंगे सर यांची 'माझी भटकंती' आज शतकाच्या घरात पाऊल ठेवते आहे. हा नक्कीच अनोखा क्षण आहे.
कोैतुक क्षण आहे.

*माणसाला ज्ञान, चातुर्य मिळवून देण्यात* *देशाटनाचा, पर्यटनाचा वाटा मोठा असतो. अशा अर्थाचं सुभाषित शेकडो* *वर्षापासून प्रसिद्ध आहे. देशाटनाचे अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीनं कदाचित निराळे* *असतील. मात्र त्यातून होणारे फायदे* *निश्चितपणे जगण्यात नवा अर्थ भरतात.* *जगण्याला नवा अाकार देतात.* *माणसाला आनंदयात्री बनवितात.*

लटिंगे सरांच्या 'भटकंती'बाबत हेच सांगता येईल. त्यांच्या फिरण्याला कैक पैलूंचं परिमाण लाभलं आहे. ते स्वतः फिरलेत हे खरंच, मात्र त्याचं 'याची देही, याची डोळां' दर्शन त्यांनी आपल्या सकस, समर्थ अन् समर्पक शब्दसामर्थ्यांतून वाचकांना घडविलं आहे. ते नक्कीच प्रशंसनीय ठरावं.

एक वेळ फिरणं सोपं ठरावं. मात्र ते अचूक अन् नेमक्या शब्दांत टिपणं कठीण. दोन- चारदा लिहिणं हेही सोपं ठरावं, मात्र शंभरी गाठणं हे तर महाकठीण. सरांनी हे लीलया साधलं आहे. त्यामुळंच त्यांच्या लेखनातली सलगता, सातत्य हे कोैतुकाचा विषय ठरते. त्यामागं दडलेले कष्ट, परिश्रम, त्यांचा व्यासंग लक्षात येतो.

*या लेखनात निसर्ग आहे, लोकजीवन आहे, प्रथा- परंपरा आहेत,* *प्रवास आहे. आहार आहे, विहार आहे.*
*मजा आहे अन्* *मनोरंजनही आहे.*
*इतिहासासोबत* *भूगोलही आहे. त्यात वैविध्यपूर्णता अन् सर्वसमावेशकताही आहे. अथपासून इथंपर्यंत सारं काही आहे.*

गणेश तांबे सरांच्या 'आई प्रतिष्ठान'च्या
कार्यक्रमात सरांची अन् माझी पहिली भेट घडली. त्यानंतर सर 'उपक्रमशील शिक्षक' परिवारात दाखल झाले. लाॅकडाउनच्या काळात सरांनी आपल्या लेखनाचा पहिला भाग लिहिला. त्यावेळीही त्यांच्याशी विस्तृत बोलणं झालं. कालही शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
आपले कुटुंब सदस्य शिवाजी निकम सरांनीही याविषयीची आठवण काल करून दिली. याच पार्श्वभूमीवर, आज
हे लेखन तीन अंकी घरात पोहोचतं आहे. सरांचा हा उत्साह, उर्मी, उर्जा नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावी.

*शतकाच्या पूर्तीनंतर पर्यटनाच्या या* *आनंददायी 'पीच'वर सरांनी आता नव्यानं 'स्टान्स' घ्यावा. पुन्हा एकदा आपल्या नव्या खेळीला आरंभ करावा. सरांची पावले सतत चालत राहावीत. हात लिहिते राहावेत.*
*त्यांच्यातील मुसाफिर सदैव उत्साही राहावा. आजच्या या अनोख्या वळणावर त्यांच्या मुसाफिरीला, प्रवासाला, लेखनाला पुनश्च* *सदिच्छा, शुभेच्छा!*

*गुरुवार। 23 जुलै 2020*
*सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा*
sunilshedage123@gmail.com
*Mob : 98224 54630*

*माझे मागील सर्व लेख वाचण्यासाठी click on*
https://sunnyspecialblog.wordpress.com

🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁

             ©  🇸 🇺 🇳 🇮 🇱
           🇸 🇭  🇪 🇩 🇦 🇬 🇪

🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड