माझी भटकंती जयपूर क्रमशःभाग क्र.९४





🥀🔅⚜️🥀🔅⚜️🥀⚜️🔅
माझी भटकंती

           🚘मैत्री टूर🤝
क्रमशः भाग-९४

   राजस्थान सन १९९७
सहावा दिवस
 🍁जयपूर पर्यटन 🍁

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
  सकाळीच सगळेजण तयार झालो.तिथचं नाष्टा पाणी केला.पंजाबी धाब्यावरील चहाची लज्जत काही औरच असते.मिठ्ठास ,वाफाळलेला,कडक आणि काचेच्या मोठा ग्लास भरून चहा.मनसोक्त चहाचा आस्वाद घेतला.
 तदनंतर आम्ही एसटीडी बुथवरुन घरी संपर्क साधला.कुठे आहोत त्याची संक्षेपाने माहिती आणि घरची खुशाली विचारली.मग आमचे गमन जयपूरला झाले.पर्यटन आणि शाही खासियत असणारं उत्तम सौंदर्यवान शहर " गुलाबी रंगछटेची पिंक सिटी " जगातील फेमस शहर. शहरात प्रवेश करतानाच  गाईड केला होता.त्यामुळे प्रमुख ठिकाण बघायला जाताना सतत चौकशीकरावी लागली नाही.गाईड हिंदीत बातचित मस्त करत होता. माहिती सांगताना ऐतिहासिक प्रसंग डोळ्यांसमोर उभे रहायचे.येथील सर्व इमारती गुलाबी दगड आणि रंग- छटेच्या आहेत.
ऐश्र्वर्यसंपन्न महाल, डोंगरमाथ्यावरील मजबूत किल्ले, शहराभोवती तटबंदी , आकर्षक उद्याने आणिमनाला नवलाईने भुरळ घालणारी हेरिटेज हॉटेल्स.आपलं कुतूहल वाढविणारी सगळी ठिकाणं.
     आम्ही प्रथम 'सिटी पॅलेस' पहायला गेलो.शहराच्या मध्यवस्तीतील लक्षवेधून घेणारी वास्तू.मारवाड आणि मुघल शैलीतल्या स्थापत्यकलेची उत्कृष्ट कलाकृती.संगमरवरी खांब , नक्षीदार कमानी,रंगीतखड्यांची पानाफुलांच्या आकाराची सजावट  पाहून तत्कालिन संस्थानिकांचे कलाप्रेम आणि सुबत्ता लक्षात येते.मन मोहरते.आर्ट गॅलरी पाहून इतिहास नजरेसमोर येतो.तदनंतर आम्ही  "विंड पॅलेस"(हवा महल ) बघायला गेलो.पाच मजली भव्य दिव्य वास्तू गुलाबी रंगाच्या संगमरवरी दगडात  बांधली आहे. महाराजा मानसिंग, मिर्झाराजे जयसिंह आणि सवाई जयसिंग या तीन पिढ्यांचा इतिहासाचा साक्षीदार आमेर राजवाडा आणि किल्ला बघितला.या वास्तू बघताना आपलं मन तिथंच रेंगाळत रहातं.नवनवीन वास्तू पाहताना भारताच्या संस्कृतीची आणि इतिहासाची महती समजते.भेटीने इतिहास स्मरणात रहातो.राजेमहाराजे यांच्या भटकंतीचे उत्तम आणि  अत्युच्च दर्जाचा "जलमहाल" बघितल्यावर सुखद अनुभव येतो.अप्रतिम वास्तूंची शिल्पकला....
मानसागर तलावाच्या मध्यभागी पाण्यावर तरंगणाऱ्या शिकाऱ्यासारखे शानदार लाजवाब सौंदर्य स्थळ आहे.बऱ्याच लोकेशनवर मस्तपैकी विविध पोजमध्ये छायाचित्रे काढली.कॅमेऱ्यात चित्रीकरण केले,
आणि आवडते सौंदर्य सिन मनोकोषात साठवले.जलमहालात जायला नौका ही  उपलब्ध असतात.गुलाबी रंगाच्या शहरातील अलौकिक पर्यटनस्थळे पाहून समाधान वाटले.
भेटूया उद्या.आशियाखंडातील उत्तम सिनेमागृहाची भेट वाचायला.
〰️➖〰️➖〰️➖〰️
क्रमशः भाग-९४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

https://raviprema.blogspot.com



प्रतिक्रिया

दिनांक १७ जुलै २०२०
वर्णन छानच . यात पंजाबी लोकांच्या चहाचे वर्णन आवडले .
वळसे नजीक एक पंजाबी धाबा होता . सरदारजीच्या दोन मुलांना शिकविण्यासाठी मी डी.एडला असताना संध्या . ६ वाजता जायचो तेव्हा गेल्या गेल्या ते सरदारजी एका भल्या मोठ्या काचच्या ग्लास मध्ये पंजाबी फेसाळलेला चहा द्यायचे . चहा पिऊन मी तृप्त होत असे .👌👌 भटकंती👌👌
श्री.रविंद्र वाघमारे सर, सातारा
प्राथमिक शिक्षक 

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड