निसर्ग सौंदर्य खेळूया खेळ कविता ३८
खेळूया खेळ
टेकडीवर खेळायची भारीच हौस
श्रावणातला बरसतो पाऊस
उनपावसाची लपाछपी सुरू
हात उंचावून पर्वतासन करु
हातापायाचे कमळ करु
कसरती करुन गंमत करु
पाऊस वाऱ्यासंगे फेर धरू
खांद्यावर हात ठेवूनी मैत्री जपू
आभाळ भरून आले
धवलश्यामल मेघ दाटले
धरणावर वर्षावती
जल संवर्धित करती
गवताची मखमली दुलई
पाऊल ओलसर होई
हिरवी तृणपाती अंकुरली
चरणस्पर्शी होई गुदगुली
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्यपुष्य ३८
Comments
Post a Comment