माझी भटकंती मैत्री टूर राजमंदिर जयपूर क्रमशःभाग ९५
☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹
माझी भटकंती
🤝मैत्री टूर🚘
क्रमशः भाग-९५
सन१९९७, सहावा दिवस
📽️राजमंदिर थिएटर जयपूर
💫💫💫💫💫💫💫💫
आम्ही जयपूर शहरातील बऱ्यापैकी एका हॉटेलमध्ये जेवण करताना गाईडने आम्हाला थिएटरची बरीच माहिती सांगितली.हौशी पर्यटकही जयपूरला आल्यावर राजमंदिर सिनेमागृह पहायला आवर्जून जातात.
जेवण करत करत सिनेमा थिएटरवर चर्चा करत होतो.संयोजकांनी सगळ्यांची आवड लक्षात घेऊन होकार दर्शविला.सहलीत सिनेमा बघायची छानच योगायोगाने पर्वणी जुळून आली.तिकिटे मिळवून देण्याची खात्री गाईडने दिली.मग काय कधी एकदा थिएटर बघायला मिळतंय असं वाटतं होतं.. वर्णन ऐकूनच आनंद झाला होता.
सिनेसृष्टीतील हिऱ्याचे कोंदण म्हणून जगातील सुप्रसिद्ध थिएटर (सिनेमागृह) " राजमंदिर" जयपूरला आहे.हे थिएटर आशिया खंडातील एक नंबरचे प्रेक्षणिय स्थळ आहे.या सिनेमागृहास "प्राईड ऑफ आशिया" हा किताब देवून सन्मानित केले आहे. तिथं सिनेमागृह आणि सिनेमा पहाण्याचा आनंदानुभव घ्यायला निघालो..
प्रशस्त थिएटर आणि प्रशस्त पार्किंग होते.गाडी पार्क करून आम्ही थिएटरच्या प्रवेशद्वाराजवळ आलो.राजमंदिर सिनेमागृह ठळकपणे अक्षरे अधोरेखित करतात.प्रशस्त व रुबाबदार इमारत .नवतारे चमकदार दिसतात.त्यास नवरत्नांचे प्रतिक मानतात.१००रुपये दराची तिकिटे काढून थिएटरमध्ये प्रवेश केला.. बहारदार थिएटर,छतावर नक्षीकाम आणि त्याला लटकणारी आकर्षक झुंबरे बघताना अवाक् झालो.अंतर्गत डेकोरेशन पाहून स्थापत्यकला, संस्कृती आणि आधुनिकतेचा मस्तच नजराणा दिसतो..मनमोहक नक्षीकाम , अप्रतिम स्वच्छता व टापटीप सर्वत्र दिसली. जाळीदार जिणे जणूकाही शाही दरबारात आगमन केल्यासारखे वाटले.तिथली बैठक व्यवस्थेला पर्ल,रुबी,एम्राल्ड आणि डायमंड अशी नावं आहेत.आपल्या कडे स्टॉल,ड्रेस सर्कल आणि बाल्कनी अशी असतात. आम्ही 'रुबी ' च तिकिट काढले होते. आसन व्यवस्था तर छानच.मऊमऊ कुशन्सच्या भारदस्त खुर्च्या होत्या. दुपारी ३ते ६चा रेग्युलर "दस्तक" सिनेमा बघितला.विश्वसुंदरी सुष्मिता सेनचा पहिलाच सिनेमा. महेश भट्ट दिग्दर्शित,शरद कपूर,मुकूल देव,मनोज वाजपेयी आणि सुष्मिता सेन हे प्रमुख कलाकार होत.त्या सिनेमातील काही गाणी आजही लक्षात येतात.जादूभरी ऑखोवाली सुनो
तुम ऐसे मुझे देखा ना करो । कुमार शानू आणि अलका याग्निक यांनी गायलेले गाणे.
किंवा पल बीत गया ये तो ,भुलेंगे हम इसको ।तुम्है कैसे मैं बताऊ,तुम्है कैसे मैं कहू....
छानच दस्तक लव्हस्टोरी सिनेमा मस्तच पण सिनेमागृह अत्युच्च दर्जाचे होते. लयभारी.सगळे जाम खुश.सिनेमा बघितल्यावर फ्रेशनेसपणा आला..ही थिएटरची आठवण कायमस्वरूपी मनात रुंजी घालेल असे तेव्हा वाटले.मग तद्नंतर सायंकाळी आमचा परतीचा प्रवास जळगाव अधिवेशन स्थळाकडे सुरू झाला.
क्रमशः भाग-९५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
प्रतिक्रिया
सर आम्ही बॉडीगार्ड हा सिनेमा पाहिलाय तिथे एकच नंबर अनुभव अन तुमच्या लिखाणामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय
श्री शैल़ेंद्र पिसाळ देशमुख
ओझर्डे

Comments
Post a Comment