माझी भटकंती सिंहगड भाग क्र.७८
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझी भटकंती
क्रमशः भाग--७८
🔆सिंहगड🔆
दिनांक १७ फेब्रुवारी २०२०
🍀〰️🍀〰️🍀〰️🍀
खेड शिवापूर आल्यावर कॉनर वरील हॉटेलमध्ये मिसळ पाव खाल्ला.व खेडशिवापूरच्या गावातील रस्त्याने कोंढणपूरला पोहोचलो.तिथं घाटाच्या पायथ्याशी पर्यटन कर देवून घाटातील वळणावळणाच्या रस्त्याने गडावर निघालो... रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू होते.सिमेंटचा रस्ता बनवत होते...
गडाच्या प्रवेशद्वाराच्या जवळील पार्किंग मध्ये गाडी पार्क केली.नुकताच"तान्हाजी " सिनेमा पाहिला होता.
हायस्कूल मध्ये असताना सहलीला आलो होतो.
त्यावेळी गडावर डोणजे कडील वाटेने पायथ्यापासून गडावर पोहचलो होतो. त्यावेळची आठवण लक्षात आली. आता गडाच्या दरवाज्या पर्यंत गाडी जातेय...
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला सिंहगड, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या अतुलनीय शौर्याचा आणि महापराक्रमाचा साक्षीदार सिंहगड. अवघ्या ५०० मावळ्यांच्या साथीने अंधाऱ्या रात्रीत कडा चढून शत्रुच्या बलाढ्य फौजेशी मुकाबला करुन शूरवीरसुभेदार तानाजी मालुसरेंनी युध्दात प्राणार्पण करुन गड जिंकला होता.
त्यांच्या अतुलनीय शौर्यास मानाचा मुजरा.
गडाच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आणखी दोन दरवाजे आहेत.पायऱ्या चढत ऐतिहासिक युध्दाच्या प्रसंगावर चर्चा करत आम्ही किल्ला पहायला सुरुवात केली..
सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगररांगेवर हा किल्ला आहे.
त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४४०० फूट आहे.गडावर दूरदर्शनचा मनोरा आहे.
दरवाज्यातून आत आल्यावर एक भग्नावस्थेतील इमारत दिसली ते त्याकाळातील दारुकामाचे कोठार होते. तसेच पुढे एक बुरुज आहे..
पायऱ्यांची वाट आहे..तसेच पुढे जाताना लाउडस्पीकरचा आवाज ऐकू येत होता.मराठी प्राथमिक शाळांचा केंद्र स्तरीय बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन सुरू होते हे आवाजा वरून लक्षात आले.
उन्हाच्या झळा लागायला सुरुवात झाली.प्रथम आम्ही नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे गेलो...समाधी स्थळी विनम्र अभिवादन केले.... ऐतिहासिक युध्दाचे प्रसंग भिंती वर रेखांकित केले आहेत.मावळ्यांचे विविध ढाल-तलवारीच्या पोजमधील शिल्पचित्र हुबेहूब रेखाटली आहेत. ती बघताना जिवंतपणा जाणवतो.आम्ही तदनंतर कोंढाणेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही देवटाकेपहायला आलो.गडावरील पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी ते देवटाके आहे.तसेच पुढे चालत चालत कल्याण दरवाज्याकडे गेलो.तिथं लागोपाट तिन दरवाजे आहेत. तिथं हौशी शिवभक्त श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात दिसले.त्यांचे तिथं फोटो शुट चालले होते.आम्हीही त्यांच्या सोबत फोटोग्राफी केली. दरवाज्यातून कड्याखाली आलो.ती वाट पायथ्याच्या कल्याण गावात जाते.
जरावेळ तिथेच विसावले.
थंडगार वाऱ्याची हळुवार झुळूक येत होती.तेव्हा गारवा जाणवत होता..कल्याण दरवाजा पाहून माघारी फिरलो.तिथून दूरदर्शनचा मनोरा लक्ष वेधून घेत होता.नंतर तटाच्या भिंतीच्या बाजूने शूरवीर तानाजी मालुसरे कड्याकडे गेलो.
जिथून काळ्याकुट्ट अंधारात मावळ्यांसह तानाजी मालुसरे गडावर चढले होते...
तदनंतर आम्ही गटावरील भटकंती आटोपून गाडी जवळ आलो.. योगेश ढाब्यावर मस्तपैकी ताकाचा आस्वाद घेऊन घाट उतरून पायथ्याला आलो.
खडकवासला मार्गे हायवेवरुन पिंपरी-चिंचवड करून भीमाशंकर कडे मार्गस्थ झालो..भेटूया उद्या धार्मिक तीर्थक्षेत्र स्थळी..
क्रमशः भाग--७८
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment