माझी भटकंती मैत्री टूर इंदौर क्रमशःभाग ९७
[6/15, 10:20 AM] ravindralatinge:
🔆🥀🍃🔆🥀🍃🔆🥀🍃
माझी भटकंती
क्रमशः भाग- ९७
मध्यप्रदेश सन १९९७
सातवा दिवस
इंदौर व परतीचा प्रवास 🛕
🌼🌞🌼🌞🌻🌞🌻🌞🌞
➖➖➖➖➖➖➖➖➖उज्जैन पासून इंदौर सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. इंदौरचे संस्थापक शूरवीर सरदार सुभेदार मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची कर्मभूमी.मल्हारराव होळकर माळवा प्रांताचे पहिले सुभेदार मराठी सत्तेची पताका डौलाने फडकवित होते...
त्यांनी भारतभर लोकहिताची अनेक कामे केलेली आहेत.नदीवरील घाट, पाणपोई,तलाव आणि विहीरी बांधकाम तसेच मंदिरांचे जिर्णोद्धार या कामातून त्यांची दानशूरता व औदार्य दिसून येते.शहराच्या मध्यवस्तीत त्यांचा सातमजली राजवाडा आहे. प्रशस्त, देखणी अन् नजरेत भरणारी वास्तू आहे.. तेथील जाळीदार नक्षीकाम आणि लाकडी गॅलरी प्रेक्षणिय आहे.इंदौर खाद्यसंस्कृती जपणारे शहर आहे.सराफा बाजार इथं उत्तमोत्तम खाद्यपदार्थांची रेलचेल असते.अनेक स्टॉल्स आपणास खूणावत असतात.मिठाई, आईस्क्रीम आणि अल्पोपहाराचे गोड,तिखट अनेक पदार्थ दिमतीला असतात. स्वादिष्ट,चवदार आणि चटकदार
खाद्यपदार्थ असतात. खवय्येगिरीत 'पोहे' डीश आपल्या कडील 'वडापाव ' सारखी फेमस तिथं आहे.पोह्याचा आस्वाद घेऊन नंतर आम्ही जळगाव कडे निघालो. इंदौर ते जळगाव अंतर २७० किलोमीटर आहे.प्रवासातच एका धाब्यावर मस्तपैकी दुपारचे जेवण करून पुढे निघालो.सलग पाच सहा तासांच्या प्रवासानंतर एका हॉटेलमध्ये चहापाणी करून थोडावेळ तिथेच थांबलो. पुढील नियोजनावर चर्चा केली.आमचा खांडवा,बु-हाणपूर , भुसावळ मार्गाने झालेला होता.रात्रीचे जेवण उरकूनआम्ही जळगावच्या अलिकडेच एका पंपावर विश्रांती साठी थांबलो. सकाळी लवकर उठून नाष्टा चहापाणी उरकून दहाच्या दरम्यानअधिवेशन स्थळाकडे निघालो..जळगाव शहरात आल्यावर अधिवेशन स्थळी चौकशी करत करत पोहोचलो.प्राथमिक शिक्षकांच्या अलोट गर्दीत अधिवेशन सुरू होते.राज्यातून बहुतांश शिक्षक उपस्थित झाले होते.
अधिवेशन कार्यक्रम समारोपानंतर परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली.घरी एसटीडी बुथमधून संपर्क साधला.कधी येणार , कुठे आहे हे संक्षेपाने सांगितले.
जळगाव ते वाई ४६०किलोमीटर अंतर आहे..जयपूर पासून सतत जास्तीचा प्रवास केला होता..रात्रभर प्रवास करत होतो.अहमदनगरला पहाटे पहाटे पोहोचलो.पंपावर विश्रांती साठी थांबलो.आता घराची ओढ लागली होती.कितीही भटकंती केली तरी शेवटी घराकडे पावलं आपसूक वळतात.सगळ्यांची सय मनात उमटते.घरी जाण्याचा उत्साह वाढतो.कधी एकदा आपल्या माणसात मिसळतोय आणि आनंद मिळवितोय असं सतत वाटत राहतं.सकाळी लवकरच आवरून मोरगाव मार्गे खंडाळ्यात आलो. गेला एक आठवडा सहलीत होतो.खुप मौजमजा केली.समृध्द, वैभवशाली आणि वैशिष्ट्येपूर्ण भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाची महती समजली.विविध अनुभव आले.
शिक्षकमित्रांसोबत सुंदर सहल संपन्नकरुन निघालो होतो.खंडाळा घाट ओलांडल्यावर एका हॉटेलमध्ये ट्रीपच्या समारोपाचे जेवण केले.तदनंतर सुरूर, ओझर्डेत पोहोचलो.सर्वांचा निरोप घेतला आणि घराकडे बिगीबिगी निघालो. सुंदर सफर "मैत्री टूर "हसतखेळत संपन्न झाली.
भेटूया उद्या गुजरात मधील नव्या ठिकाणच्या भटकंतीला तोपर्यंत नमस्कार.
क्रमशः भाग-९७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment