माझी भटकंती मैत्री टूर गांधीनगर ते माऊंट आबू प्रवास भाग क्र.८८
🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️
माझी भटकंती
🤝मैत्री टूर🤝
क्रमशः भाग-८८
🚘 गांधीनगर ते माऊंट आबू
तिसरा दिवस सन १९९७
〰️➖〰️➖〰️➖〰️
गांधीनगर ते माऊंट आबू हा लांबचा पल्ला होता.साधारण पणे तीनच्या दरम्यान आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. गुजरात मधील रस्त्यांच्या दुतर्फा विशेषतः लिंबाचे वृक्ष बहुतांश आढळतात. अक्षरधाम मंदिर, राजकारण आणि सिनेमा या विषयावर गप्पा मारत निघालो होतो.
गुजरातची सीमा ओलांडून आम्ही राजस्थान राज्यात प्रवेशलो, मरुभूमी म्हणून लौकिक असलेला प्रदेश.ऐतिहासिक, ऐश्वर्यसंपन्न आणि संस्थानिकांचा प्रदेश, मेवाड आणि मारवाड असा वैशिष्ट्येपूर्ण प्रांत. एकीकडे वाळवंट तर दुसरीकडे अरावली पर्वताच्या डोंगररांगा. पृथ्वीराज चौहान आणि महाराणा प्रताप या महापराक्रमी आणि शौर्यवान राजांची भूमी, महान पतिव्रता राणी पद्मिनी यांची भूमी.जागतिक दर्जाची नामांकित पर्यटन स्थळे अजमेर,बिकानेर, जयपूर, उदयपूर, रणथंबोर , माऊंट आबू इत्यादी ठिकाणे पहायला देशी विदेशी हौशी पर्यटक लाखोंच्या संख्येने येतात.कारण इथले शाही पॅलेस, आकर्षक उद्याने आणि नैसर्गिक झील मनमोहक लोकेशन मनाला भुरळ घालतात.
रात्री आठच्या सुमारास आम्ही मोठा अंबाजीला येऊन पोहोचलो.एका राजस्थानी धाब्यावर गाडी थांबवली. मस्तपैकी नॉनव्हेज स्पेशल राजस्थानी चिकन थाळीची ऑडर दिली. निवांत पणे यथेच्छ जेवणावर ताव मारला. तेथून पुढील प्रवास घाटातून होता. दीड-दोन तासाने आम्ही माऊंट आबूला पोहोचणार होतो...
माऊंट आबू हे राजस्थान मधील थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे.आम्ही मध्यरात्रीच्या सुमारास माऊंट आबूला पोहोचलो.नाक्यावरच एम एच ११ पासिंग पाहून गाईड कम लाॅजिंग एजंटनी अक्षरशःगाडीला गराडा घातला.आम्ही मागील मंडळी निवांत झोपलो होतो.आवाजाने बाकीचे जागे झाले. खाली उतरून जाधव सर, पोतदार सर आणि नाळे सरांनी एक दोघांशी चर्चा केली.त्याला बरोबर घेऊन एका हॉटेलकम लॉजमध्ये आलो. कॅरेजवरील साहित्य काढले.दोन रुम घेतल्या होत्या. चौघाचौघात एक रुम.. मस्तपैकी बेड होते.दोन दिवस निवांत विश्रांतीची सोय झाली नव्हती. तसेच भरपेट जेवणाने झोप डोळ्यावर आली होती.त्यामुळे पटकन सगळे चिडीचूप झाले...शुभ रात्री.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
क्रमशः भाग---८८
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema. blogspot.com
Comments
Post a Comment