माझी भटकंती मैत्री टूर उदयपूर प्रवास भाग क्र.९०




   🌀🥀🌀🥀🌀🌀🥀🌀
 माझी भटकंती
         🤝मैत्री टूर🤝
क्रमशः भाग-९०
सन १९९७

 🔆माऊंट आबू ते उदयपूर प्रवास व शॉपिंग🌼
      चौथा दिवस
🌸〰️🌸〰️🌸〰️🌸
    माऊंटआबू येथील जगप्रसिद्ध पर्यटनस्थांना भेट दिल्यानंतर.वाटेतच एका चांगल्या हॉटेलमध्ये दुपारचा जेवणाचा  बेत करून मोठा अंबाजीला घाट उतरून हायवेला आलो.माऊंट आबू ते उदयपूर  सुमारे २१० किमीचे अंतर होते.नेहमी प्रमाणे  प्रवास सुरू झाला होता.रात्रीचं सात-आठ सुमारास आपण उदयपूरला जातोय तर मग थोडंफार शॉपिंग करायला जावूया. राजस्थानी प्रसिद्ध हातमागा वरील मटेरियल,उंची सिल्क साड्या आणि रजया घेवूया.तिथं चांगल्या प्रतीच्या मिळतात.असं समजलं आहे.
यावर चर्चा करून सर्वानुमते शॉपिंगला जाण्याचे ठरले.दुपारच्या जेवणामुळे काहींना डुलकी लागत होती.तर काहींच्य गप्पा चालल्या होत्या.
  आमची गाडी गुडकंडिशन मध्ये होती.आणि ड्रायव्हरही खूपच चांगला होता. सफाईदारपणे व्यवस्थित नियंत्रित गाडी चालवायचा.तो या भागात वाईतील ट्रीपा घेऊन अनेकदा आलेला होता.त्यामुळे  बराचसा हा भाग त्याच्या परिचयाचा होता. इतरांकडे मार्गाची चौकशी सुध्दा योग्य भाषेत करून त्याप्रमाणे गाडी चालवायचा. गरजेनुसार चहा प्यायला फक्त थांबायचा.
 रात्रीचे आम्ही सात-आठच्या दरम्यान उदयपूरला पोहोचलो.
चौकशी करून मुख्य बाजारपेठेत गाडी घ्यायला लावली.विद्युत रोषणाईने तर शहर विलोभनीय दिसत होते.ऐश्र्वर्यसंपन्न आणि सुबत्तेच्या मेवाड संस्थानच्या राजधानीचे शहर होते.बाजारपेठ आल्याची दिसल्यावर गाडी पार्क केली.आणि खरेदीसाठी आम्ही बाहेर पडलो.दुतर्फा उंची वस्त्रांची शोरुम दालनं सजवलेली दिसत होती विविध फॅशनेबल राजस्थानी वस्तू, मटेरियल, उंची साड्या,रजया आणि नानाविध वस्तु बघत आणि किंमत विचारत जात होतो.वस्तू नजरेत भरत होत्या.घेण्याचा मोह होत होता. थोड्या वेळाने पुढे एका शाही शोरुम मध्ये गेलो.
नामांकित दालन वाटत होते.स्वतंत्र विभाग होते.प्रथम साडी विभागात गेलो.सेल्समनने स्वागत केले.बजेट विचारले.आम्ही हजार ते पाचशेचे सांगितले. मग त्याने त्या किंमतीच्या  रेंजच्या साड्या दाखवायला सुरुवात केली. विविध रंग,पोत,प्रकारच्या दाखवत होता.आम्ही साडीच्या दर्जापेक्षा किंमतीचे लेबल पाहून 'और दुसरी दिखा दो। 'म्हणत होतो. सेल्समनने आम्हाला बरोबर हेरलं आणि तो म्हणाला,'साहेब अब किमत के शिवा माल का दर्जाभी  देखो,तुम्हे जो मनपसंद चीज पडती है। ओ लेके जाव,आप पैसे कि चिंता मत करो। आप २५परसेंट पैसा देके अॅडव्हान्स बुकिंग कर सकते है।पोस्ट व्हि.पी.पार्सल द्वारा पैसे देकर  वस्तू ले सकते हो। मग काय ?अगोदर लो बजेट मनात येत होते.अजून प्रवास आहे. इथं रोख पैसे देऊन खरेदी केली तर पुढे टंचाई जाणवू नये म्हणून हात आखडता घेत होतो.त्याच्या बोलण्याने हुरुप आला आणि मग घरच्यांना सहलीची भेट म्हणून भारीतल्या  सिल्क साड्या दाखवायलासांगितले.
त्याने चंदनाचा वास असणारी सुगंधित सिल्क साडीदाखविली.खरंच वास घेतला की सुंगध दरवळत होता.लाईट कलरमध्ये नवनवीन डिझायनचे शेकडो प्रकार होते.दोघा-तीघांचा प्रश्न साडी धुतल्यावर वास टिकेल का? मग त्याने साडीचा छोटासाच भाग पाण्यात बुडवला आणि चोळला.ते सुकेपर्यंत आम्ही मऊशार ,उबदार आणि मुलायम रजयाची सॅम्पल बघतली.साईज व रंगाप्रमाणे २५ टक्के रक्कम देऊन खरेदीचे बुकिंग केले.सोयीचे वितरण व्हावेव आम्हाला कळण्यासाठी वाईतील श्री पोतदार,श्री जाधव व श्री पंडितसर या शिक्षक मित्रांचे पत्ते दिले.तदनंतर साडी विभागाकडे आलो. भिजवलेल्या साडीचा छोटासाच भाग पुन्हा वास घेऊन बघितला तर सुगंध येत होता.मग खात्री पटली. त्याच प्रकारच्या सिल्क साड्या  बुकिंग करून घेतल्या.रिसीट घेतले. चांगली खरेदीझाल्याचं समाधान लाभले. उंची वस्तू खरोखरच मनमोहक आणि नजरेत भरण्यासारख्याहोत्या. विशेष म्हणजे आम्ही वाईत आल्यावर पाच-सहा दिवसांनी पार्सल आले.पैसे भरुन ताब्यात घेतले.खात्री करण्यासाठी उघडून बघितले. फक्त एक रजई  लाल रंगा ऐवजी काळसर रंगाची पाठविली होती..खूपच मोठी बाजारपेठ होती.मग गाडीजवळ आलो. तेथून जवळच्या एका बऱ्यापैकी लॉजवर मुक्काम करायला गेलो.साहित्य उतरून घेतले.दोन प्रशस्त रुम होत्या.मस्तपैकी फ्रेश झालो.उद्याच्या भटकंती आणि कॉमन खर्चावर चर्चा केली.एका जवळच्या हॉटेलमध्ये स्वादिष्ट नॉनव्हेज पदार्थांची चव चाखली.
भरपेटजेवलो.शतपावली करत करत लॉजवर आलो.सर्वांना गुडनाईट करून विश्रांती घेतली.
शुभ रात्री...
🍀🔅🍀🔅🍀🔅🍀
क्रमशः भाग-९०

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे

https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड