माझी भटकंती वेरुळ भाग क्र. ८३





     माझी भटकंती
🛕☘️🛕☘️🛕☘️🛕☘️
        माझी भटकंती
क्रमशः भाग- ८३
          🛕 वेरुळ🛕
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
      महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैभवशाली वारसास्थळ म्हणजे वेरुळ येथील प्राचीन काळातील लेणी.भारताने जगाला दिलेला अनमोल ठेवा
 येथील लेणी युनोस्को घोषित "जागतिक वारसा स्थळ "असल्याने देशी विदेशी हजारो  पर्यटक ,अभ्यासक व संशोधक या स्थळाला भेट देतात.
      प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर येथील अधिवेशन झाले होते . त्यावेळीपरतीच्या प्रवासात अजिंठा वेरूळ लेणी पाहिली होती.तदनंतर श्री दिलीप दारकड या आचारी मित्राच्या भावाच्या जालना येथील लग्नास उपस्थितराहून वेरुळ व शिर्डीला गेलो होतो.
अलीकडे औरंगाबादला पर्यायी शिक्षण विषयी प्रशिक्षण असताना वेरुळ येथील लेणी व घृष्णेश्वर मंदिराला सातारा जिल्ह्यातील पर्यायी साधन व्यक्ती समवेत भेट दिली होती.                               ☘️   घृष्णेश्वर मंदिर
 घृष्णेश्वर मंदिर धार्मिक तीर्थक्षेत्र औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ या गावी आहे.जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांचा ओघ सुरू असतो.श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला  आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात देवदर्शन करण्याची संधी मिळाली.. प्रशस्त मंदिर लालदगडामध्ये बांधलेले आहे.वास्तुकलेचा एक  उत्तम नमुना पहायला मिळाला.मंदिराच्या छतावर  पशुपक्ष्यांची सुबक चित्रे रेखाटली आहेत.
 तदनंतर आम्ही वेरुळची जगप्रसिध्द लेणी पहायला निघालो.
      सह्याद्री पर्वताच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरातील दोन तीन किलोमीटर च्या परिसरातील खोदलेली आहेत.तिथं हिंदू , बौद्ध आणि जैन धर्माच्या लेण्यांचा समूह आढळतो.
बौध्द लेणी विशेषतः विहार स्वरुपात आहेत.त्यात गौतम बुद्धाची मूर्ती,स्तूप, गुंफा आणि  गाभारा स्वरुपात आहेत..वास्तूकलेचे  अप्रतिम सौंदर्य आपल्याला पहायला मिळते.सुबक नक्षीकाम विविध रचना , मूर्ती काम पाहून आपण थक्क होतो.
क्षणाक्षणाला उत्कंटा वाढविणारी ठिकाण....
               हिंदू धर्मिय लेणी
   ही इतर लेण्यांपेक्षा वेगळ्या शैलीचे खोदकाम केलेले जगातील एकमेव कोरीव शिल्प आहे.कातळ वरुन फोडून त्यावर सुबक कोरीव काम केलेली वास्तू म्हणजे" कैलास मंदिर"कैलास पर्वतासारखे मंदिर दिसते.
स्थापत्यकलेचा अप्रतिम प्रकार. पहाताना विलोभनीय दृश्य दिसते.
अनेकमजली मंदिर आहे.
सुबक नक्षीकाम व कोरीव काम केलेले आहे.
अप्रतिम कलाकृती .जैन लेणी इतरांच्या तुलनेत छोटी असून त्यातील बारीक नक्षीकाम व चित्रे वैशिष्ट्ये पूर्ण आहेत.
ही लेणी म्हणजे भारतातील धार्मिक  कोरीवशिल्पकलेचा अलौकिक अनमोल ठेवा आहे....
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

क्रमशः भाग- ८३
       

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड