निसर्ग सौंदर्य सनसेट कविता २९
सूर्यास्त
अस्ताचा रवी उजाळी सरोवरी
मस्त प्रतिबिंब दिसे जलावरी
सोन्याचा तांबूस गोळा
गुलाल उधळीत निघाला ||
सांजवेळी नौकाविहार
मजाच मजा अपार
देखणं रुप बहारदार
सरोवराचे दृश्य शानदार ||
हर्षो-उल्हासाची लाट सुखकर
डोंगरा पल्याड जाय दिनकर
नवचेतनेला देई आकार
करील स्वप्न साकार ||
पर्यटनाचं ठिकाण आवडतं
भास्कराचे रुप खुलतं
मनाला भुरळ पाडतं
मन तिथचं रेंगाळतं||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प २९
छायाचित्र वेण्णा लेक महाबळेश्वर
Nice sunset
ReplyDelete