निसर्ग सौंदर्य चिखली मश्वर कविता २५


   निसर्ग सौंदर्य
ऊन सोनेरी सगळीकडे
डोंगररांगांचे गावाला कडे! 
पायथा पिवळसर,माथा हिरवागार
कौलारू घरं, शिवार आयताकार !
गाव मधी अन् सभोवती शेते
सांज प्रकाशाने ते चमकते !
गवत वाळके, सराई  सोनेरी
हिरव्या नक्षीचे ठिपके भारी !

 रम्य दृश्य लक्ष वेधते
शुध्द हवा तजेला देते
झाडोऱ्यात मन सुखावते
अशा सौंदर्यात मन रेंगाळते!!

 गावच्या भोवती डोंगरराई
वाडीवस्तीला कुशीत घेते
डेरेदार वृक्षांची वनराई
गाव वाटेला झाडीत लपविते!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड