माझी भटकंती अहमदाबाद सायन्स सिटी व लेक क्रमशःभाग ९८
💎🚀🚀💎🚀💎🚀🚀माझी भटकंती
क्रमशः भाग-९८
सन-मे २०१९
🚀सायन्स सिटी व कांकरिया लेक अहमदाबाद❄️
➖➖➖➖➖➖➖➖
अहमदाबाद शहरापासून जवळच सायन्स सिटीतील पृथ्वीचा महाकाय 'ग्लोब' आपले लक्ष वेधून घेतो.तिथेच गुजरात मधील सायन्स सिटी आहे.प्रशस्त जागेतआयमॅक्स थ्रीडी थिएटर,स्पेस सेंटर ऑडिटोरिअम, विज्ञान कक्ष सभागृह, म्युझिकल फाऊंटन,एनर्जी पार्क , डायनासोरपार्क व पृथ्वीचा ग्लोब इत्यादी विज्ञानाची माहिती देणारी आपली उत्सुकता वाढवणारी ठिकाणे आहेत.मुख्य आकर्षण 'स्पेस सेंटर ' संपूर्ण वातानुकूलित आहे.अवकाशविषयक क्षेपणास्त्र, विविध अवकाशिय वस्तूंचे प्रदर्शन,कृतीयुक्त प्रयोग, खगोलीयमाहिती,अवकाश वीरांसोबतचा सेल्फिपाॅईंट,आपले प्रत्येक ग्रहावर किती वजन होईल याचा वैज्ञानिक वजनकाटा,आरश्यांतून आपल्या दिसणाऱ्या असंख्य प्रतिमा पाहून अद्भूत वाटते.
अवकाश शास्त्राची इत्यंभूत माहिती पाहून, वाचून आपण चकित होतो.छोटे प्रयोग करताना कृतीयुक्त अनुभवात आपण रममाण होतो. अंतराळातील विविध माहिती आणि चित्र, प्रतिकृती पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो.एक तास कधी संपला हे लक्षात आलं नाही. पर्यटकांबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे सेंटर म्हणजे अनमोल खजिना आहे. सेंटरच्या बाजूला अवकाश क्षेपणास्त्राची प्रतिकृती आहे.
विज्ञान केंद्रात विज्ञान विषयांचे अनेक सेमिनार वर्षभर आयोजित केले जातात.अनेक सुप्रसिद्ध संशोधक व शास्त्रज्ञांची माहिती प्रदर्शित केलेली वाचायला मिळते.
तदनंतर आम्ही एनर्जी पार्क पहायला गेलो.तिथं सोलर, पाणचक्की, पवनचक्की यावर आधारित विविध प्रयोग ,प्रकल्प व कारंजे आपणास पहावयास मिळतात.वैज्ञानिक तंज्ञाचा उपयोग विविध प्रकल्पात केलेला पहायला मिळतो.
महाकाय पृथ्वीचा ग्लोब पाहून तर मन थक्क झाले. ग्लोबच्या आतमध्ये पृथ्वीच्या विविधांगी भागाचे प्रदर्शन पहायला मिळते.
आयमॅक्स थिएटरमध्ये डायनासोरच्या जीवनावरील इंग्रजी सिनेमाबघितला.गॉगल घालून Three Di सिनेमा बघण्याचीपहिलीच वेळ असल्याने चित्र एकदम जवळच दिसल्याने घाबरलो जरा भिती वाटली होती.नंतर हळूहळू सिनेमा पहाताना मजा आली.मस्तच तंत्रज्ञानाची कमाल. तदनंतर आम्ही दोघे सायंकाळी चारच्या सुमारास कांकरिया लेक बघायला निघालो.
शहराच्या मध्यवर्ती भागात भव्य दिव्य 'लेक 'आहे.बच्चेकंपनीच्या मौजमजेचे अप्रतिम ठिकाण आहे.एकाच ठिकाणी मुलांना प्राणी संग्रहालय,मत्स्यालय,अम्युझमेंट खेळणी (यंत्रावर चालणारे विविध झोपाळे) , छोटीसी ट्रेनची सफर आणि खाद्यपदार्थांची विविध दुकाने. अन् जोडीला तलावातील बोटिंग.रमणीय,मस्तपैकी विरंगुळ्यासाठी उत्तम लोकेशन.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्कलमध्ये बांधलेला प्रशस्त तलाव आहे.तलावाच्या कडेकडेने फिरायला मजा वाटते. अंदाजे ४किमीच्या परिघामध्ये मस्तपैकी फिरणं होतं.वृक्षांची सावली.जागोजागी लेक पहायला केलेली बैठक व्यवस्था, संपूर्ण तलावाच्या कडेने रेलिंग केलेले आहे.लहानाबरोबर मोठ्यांचेही हे स्थळ आकर्षक बनलेले आहे.
सायंकाळी छान पैकी थुईथुई पाऊस पडत होता.छत्री घेऊन तलावाच्या कडेने फिरत,बघत फोटो काढत होतो. तेथील मस्यालय पाहिले.
फिशटॅंकमधील वेगवेगळे सागरी मासे बघताना कुतूहल निर्माण झाले.विविध आकाराचे आणि रंगीबेरंगी मासे बघताना मनस्वी आनंद झाला.एका स्टॉलवर पावभाजी व मटका कुल्फीचा आस्वाद घेतला.
पावसातही हौशी लोकांची वर्दळ होती.पाऊस वाढायला लागल्याने निम्म्यापर्यत चालत जाऊन माघारी फिरलो.विरंगुळ्यासाठी मस्तच कांकरिया लेक आहे.
भेटूया उद्या गांधीनगर मधील सॉल्ट माउंटन दांडी कुटीर पहायला....
क्रमशः भाग-९८
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
[5/22, 12:45 PM] ravindralatinge:
माझी भटकंती
क्रमशः भाग-९८
सन-मे २०१९
सायन्स सिटी अहमदाबाद
Nice
ReplyDelete