माझी भटकंती भीमाशंकर भाग क्र.७९
माझी भटकंती
क्रमशः भाग--७९
भीमाशंकर
☘️ 🚩☘️🚩☘️🚩☘️🚩
माझी भटकंती
क्रमशः भाग--७९
दिनांक १७ फेब्रुवारी २०२०
☘️भीमाशंकर ☘️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
चाकण- राजगुरुनगर वरुन वाडा रोडनेपांगरी,चासकमान धरण्याच्या कडेकडेने व डोंगररांगेच्या पायथ्याने वेताळेवाडा,आव्हात,
खारोशी, मांडोशी करत करत निघालो.एके ठिकाणी बऱ्यापैकी हॉटेलमध्येवडापाव खाल्ला आणि घाटरस्त्याने चढत चढत पठारावर आलो.
थोड्या अंतराने घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्याला लागलो.
भीमाशंकर आल्यावर पार्किंगची चौकशी केली.
त्याने एस.टी.स्टॅण्डकडे जावा असं सांगितलं...मग स्टॅंडवर येऊन गाडी पार्क केली.. सोमवार होता तिन्हीसांज झाली होती..तसेच देव दर्शनाला निघालो..स्टॅण्ड मधून बाहेर येऊन मंदिराकडे निघालो.डाव्या बाजूला एक रस्ता मंदिराकडे जाणारा दिसला पण तो लोखंडी गेटने बंद होता.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घनदाट जंगल व डोंगर रांगेच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य व नीरव शांत परिसरातील तिर्थक्षेत्र.भीमा नदीचेउगमस्थानआहे.पठारा वरुन मंदिरात जाताना 'श्री क्षेत्र जय भीमाशंकर ' लोखंडी कमान लागते.बांधीव पायऱ्या उतरून मंदिराकडे निघालो..प्रशस्त पायऱ्या होत्या..पायऱ्या उतरून मंदिराजवळ आलो.मंदिराचे दुरुस्तीचे काम सुरू होते.उंच कळसाचे दर्शन झाले.मंदिरात गेलो.मंदिराच्या छतावर व खांबावर सुबक नक्षीकाम केलेलेआहे.तुरळक गर्दी असल्याने शांतपणे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले.शांत व प्रसन्न वातावरण होते.थोडा वेळ शांतपणे मंडपात बसलो.
मंदिरात सभामंडप व गाभारा आहे.सभामंडपा बाहेर मोठी घंटा आहे.स्वच्छ व निर्मळ धार्मिक स्थळ वाटले.नंतर
गाडी जवळ आलो.. मुक्कामाच्या सोयीसाठी समोरच्या लॉजिंग मध्ये चौकशी करायला गेलो.रुम पाहिली.बजेटमध्ये होती.अनिकेत हॉटेलकम लाॅजमध्ये मुक्काम केला..
फ्रेश होऊन जेवणासाठी बाहेर आलो.. जवळच्याच श्री संतोष हॉटेलमध्ये शाकाहारी जेवणाची ऑडर दिली.
मालकाने आदबीने कोण कुठले काय चौकशी सुरू केली.पाऊसपाणी व शेतीच्या गप्पा सुरू झाल्या.. 'सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला करतो,
तोच इथं व पुण्याला विक्रीला पाठवितो. हॉटेलमध्येही त्याचाच वापर करतो''..असे त्यांनी सांगितले .मग त्यांना विकत काही धान्य किंवा भाजीपाला मिळेल का? असं पत्नीने विचारले. बटाटे व इंद्रायणी तांदूळ आहेत...त्याचे प्रतिउत्तर नमुना पहायला मिळेल का?म्हटल्यावर ,त्याने बटाटे व इंद्रायणी तांदळाची सॅम्पल वेटरला आणायला सांगितली. तोपर्यंत आमची जेवणाची ऑडर तयार झाली होती. .. मस्तपैकी जेवण केले..ताजे , रुचकर व घरगुती जेवण होते.मुलांनीजेवण चांगलं असल्याची प्रतिक्रिया दिली. नंतर सॅम्पल बघून मी व पप्पूने १५ किलो बटाटे व १५ किलो तांदूळ विकत घेतले..
हॉटेलवर येऊन गप्पागोष्टी करत.उद्या सकाळी लवकर उठून जंगलात फिरायला जायच नियोजन सांगून.
व्हाटसअप व फेसबुक बघितले.दिवसभर तसा कानाडोळाच केला होता.
भरपूर मेसेज आले होते.ते बघून तद्नंतर विश्रांती घेतली....
शुभ रात्री.
क्रमशः भाग- ७८
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
सुंदर लेखन
ReplyDelete