💎🚀🚀💎🚀💎🚀🚀माझी भटकंती क्रमशः भाग-९८ सन-मे २०१९ 🚀सायन्स सिटी व कांकरिया लेक अहमदाबाद❄️ ➖➖➖➖➖➖➖➖ अहमदाबाद शहरापासून जवळच सायन्स सिटीतील पृथ्वीचा महाकाय 'ग्लोब' आपले लक्ष वेधून घेतो.तिथेच गुजरात मधील सायन्स सिटी आहे.प्रशस्त जागेतआयमॅक्स थ्रीडी थिएटर,स्पेस सेंटर ऑडिटोरिअम, विज्ञान कक्ष सभागृह, म्युझिकल फाऊंटन,एनर्जी पार्क , डायनासोरपार्क व पृथ्वीचा ग्लोब इत्यादी विज्ञानाची माहिती देणारी आपली उत्सुकता वाढवणारी ठिकाणे आहेत.मुख्य आकर्षण 'स्पेस सेंटर ' संपूर्ण वातानुकूलित आहे.अवकाशविषयक क्षेपणास्त्र, विविध अवकाशिय वस्तूंचे प्रदर्शन,कृतीयुक्त प्रयोग, खगोलीयमाहिती,अवकाश वीरांसोबतचा सेल्फिपाॅईंट,आपले प्रत्येक ग्रहावर किती वजन होईल याचा वैज्ञानिक वजनकाटा,आरश्यांतून आपल्या दिसणाऱ्या असंख्य प्रतिमा पाहून अद्भूत वाटते. अवकाश शास्त्राची इत्यंभूत माहिती पाहून, वाचून आपण चकित होतो.छोटे प्रयोग करताना कृतीयुक्त अनुभवात आपण रममाण होतो. अंतराळातील विविध माहिती आणि चित्र, प्रतिकृती पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो.एक तास कधी संपला हे लक्...