निसर्ग सौंदर्य कविता ज्ञानमंदिर ५२
डोंगराच्या पायथ्याशी
निसर्ग सौंदर्याची कुशी
गडकोट दिसे सभोवरी
भातशेतीची खाचरं शिवारी ||
दोन राऊळे समोरासमोर
एक ज्ञानाचा सागर
दुसरे शक्तीचे आगर
मिळे मांगल्याचे सार ||
हिरवाईने सजलेलं मैदान
आभाळीहिरवी छटा छान
अभ्यागतांचे करण्या आगत
बोलक्याभिंतीकरती स्वागत ||
हसती,खेळती नाचती गाती
अक्षरलेण्यांचे धडे घेती
प्रयोगशील कृतीतून शिकती
आनंददायी अनुभव घेती ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
छान कविता
ReplyDelete