माझी भटकंती परळी वैजनाथ १०९




☘️🛕☘️🛕☘️🛕☘️🛕
माझी भटकंती
भाग क्रमांक--१०९
धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
सन २०००तिसरा दिवस
🔆 परळी वैजनाथ  🔆
💫〰️💫〰️💫〰️💫
लातुरमध्ये सकाळी लवकर नित्यक्रमे उरकून सगळेजण बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथला निघालो.लातूर ते परळी अंतर ६५ किमी आहे.
सकाळच्या प्रहरी शांत वातावरणात प्रवास सुरू होता.वाटेतच एका धाब्यावर नाष्टा व चहापान उरकले.
साडेनऊच्या सुमारास मंदिर परिसरात पोहोचलो.
    परळी वैजनाथ येथील महादेव  मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.ते प्राचीन असून जागृत देवस्थानआहे.मराठवाड्यातील प्रसिध्द धार्मिक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे.
पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकरांनी यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे.मंदिराच्या तिन्ही दिशेला प्रवेशद्वारे आहेत.
मंदिराकडे जाण्यासाठी लांबवर पायऱ्या आहेत.
सभामंडप व गाभारा एकाच पातळीत आहे.
  गाभाऱ्यावर कलात्मक नक्षीकाम केलेले आहे. मंडपातुनही देवदर्शन होते.गर्दी कमी असल्याने लगेच दर्शन झाले.
गाभाऱ्यातील पिंडीचे मनोभावे दर्शन घेतल्यावर समाधान वाटले.ओम नमो शिवाय , हर हर महादेव या नामस्मरणाचा जयघोष ऐकू आल्यावर आम्हीही त्यांच्या सादाला संगत करीत होते.. नामस्मरणाने मनाला शांतता मिळाली.मंदिरात प्रसन्न आणि भक्तीमय वातावरण होतं.तदनंतर बाहेर येऊन कळश दर्शन घेऊन गाडीकडे निघालो.परिसरात तीनकुंडे आहेत.येथे जवळच औष्णिक ऊर्जा केंद्र आहे.तदनंतर येता येता पूजेची थोडीफार खरेदी केली.मुलीसाठी छान बाहुली घेतली.मग औंढा नागनाथ कडे मार्गस्थ झालो.कुंभार राजे आणि कुंभार बाईंसोबत आमचा भैया छान रमायचा.
गाणी ऐकत घरगुती गप्पा मारत प्रवास चालला होता..
परळी वैजनाथ ते औंढा हे अंतर सुमारे १२५ किमी होते.रस्ताही चांगला होता.बीड जिल्ह्यातून पुढे परभणी हिंगोली कडे निघालो होतो.
   आपल्या पेक्षा जास्त उन्हाच्या झळा जाणवत होत्या.एके ठिकाणी चहा घेतला.तिथं जवळच असणाऱ्या भाजीच्या गाडीवर हरभऱ्याचे डहाळे दिसले.त्याच्या दोन पेंड्या व केळी विकत घेतली आणि पुढं निघालो. सिझनला ओला हरभरा खाणं माझी खासियतच.
 बाजारात हरभऱ्याच्या  पेंड्या दृष्टिस पडल्याकी हमखास घेणं व्हायचं.त्याच्या सुक्क्या भाजीची चवच न्यारी लागते.हरभरा घाटे दाताने  सोलून खाण्याचा कार्यक्रम सुरु होता.अधूनमधून घाटे हाताने सोलून मुलालाही देत होतो.काहीवेळाने एकच्या सुमाराला आम्ही औंढ्याला पोहोचलो.भेटूया उद्या धार्मिक औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी तोपर्यंत ओम् नमः शिवाय....
भाग क्रमांक १०९
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड