माझी भटकंती मार्लेश्वर १०४


🥀☘️🥀☘️🥀☘️🥀☘️ 
   माझी भटकंती
भाग क्रमांक-१०४
       सन २००५
          श्री क्षेत्र  मार्लेश्वर   
〰️🌱〰️🌱〰️🌱〰️🌱 
कुटुंबियआणि नातेवाइकांसह आम्ही कोकण ,गोवा ते म्हैसूर अशी ट्रीप आयोजित केली होती.ओझर्डेहून आम्ही सकाळी लवकरच कराडला पोहोचलो.तिथं मावशीकडे जेवण केले.आमच्याबरोबर आता मावशी,
मामा,पपू, गणेश हे सहभागी झाले.आम्ही हायवे सोडून उंडाळे रस्त्याने घोगाव,कोकरुड करत शाहूवाडीला पोहोचलो.तदनंतर आंबा घाटातून निनावे करत करत मार्लेश्वर कडे निघालो होतो.
   सह्याद्रीची विलोभनीय दृश्येच दृश्ये आपणास भटकंतीसाठी खुणावत असतात.सह्याद्रीची ऐश्वर्यसंपदा गड,किल्ले, आकाशाला गवसणी घालणारे उत्तुंग कडे सरळसोट सुळके, घनदाट अरण्याने व्यापलेल्या दऱ्या व पठारं, पायपीट करत दूर नेहणाऱ्या जंगलवाटा , कड्यावरुन वाहणारे धबधबे आणि डोंगराच्या कुशीत,कड्यात  असणारी स्वयंभू तीर्थक्षेत्रे,अशी एकसोएक सौंदर्य स्थळे पाहून मनीचा मोर आनंदाने फुलून जातो.काही काळ निसर्गरम्य परिसरात नीरव शांततेत आणि स्वच्छ हवेत थकवा पळून जातो.ताजेतवाने होऊन प्रसन्न वाटतं.आमची गाडी वळणावळणाच्या चढ उताराच्या रस्त्याने मार्लेश्वरच्या पायथ्याशी पोहचली.सगळे खाली उतरून गाडी पार्किंग मध्ये लावली. "स्वयंभू तीर्थक्षेत्र मार्लेश्वर,मारळ ''या नावाची भव्य प्रवेशकमान आपले लक्ष वेधून घेते.पुढे मंदिर व धबधब्याकडे जाताना सुमारे ५००सुबक पायऱ्या आहेत.खोलदरी, घनदाट जंगल पहात पहात पायऱ्यांवरुन पुढं निघालो होतो.लहान मुलं असल्याने त्यांच्या गतीनं आणि मूडप्रमाणं रमतगमत निघालो होतो.निसर्गातील दृश्यांचा नजारा मस्तच दिसत होता.पावसाळा असता तर सर्वत्र हिरवेगार कडे आणि फेसाळत कड्याखाली वाहणारे धबधबे.एकदाचं मंदिराजवळ आलो.एका गुहेत हे मंदिर आहे.गाभारा कमी उंचीचा आहे.आतमध्ये दोन पिंडी आहेत.त्यांना मार्लेश्वर व मल्लिकार्जुन नावे आहेत.मनोभावे शांतचित्ताने सर्वांनी महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले.मंदिराच्या तिन्ही बाजूंनी उंच कडे असून समोरच नेत्रदीपक असा धबधबा आपणास दिसून येतो.जणू काही भगवान शंकराच्या जठेतून गंगा प्रवाहित झाली आहे.याच धबधब्याची पुढं बाव नावाची नदी प्रवाहित होते.दोन्ही स्थळ पाहून आनंदानुभव घेऊन पायऱ्या उतरून खाली आलो.पायथ्याच्या दुकानातून मुलांना खाऊ व प्रसाद घेऊन पुढे साखरपा, पाली,नानज, हातखंबा करून गोवा हायवेला लागलो.नंतर निवळी फाट्यावरून सायंकाळी गणपतीपुळेला पोहोचलो.
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
भाग क्रमांक- १०४

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड