निसर्ग सौंदर्य सागर किनारा कविता ६५
काव्य पुष्प ६५
सागरकिनारा
कातळाचा खडकाळ किनारा
नयनरम्य विशाल सागराचा
कड्यांचा लांबट अर्धगोल
पायऱ्यांचा मार्ग प्रदक्षिणेचा
फेसाळत्या लाटा
खडकावर आपटती
जलतरंगाच्या लहरींचे
तुषार सिंचती
लाटांच्या तडाख्याने
कातळ घासती
लाटांच्या गाजेचा
नाद उमटती
रोमहर्षक दृश्य पाहूनी
अंग शहारते
लाटांच्या शिंपण्याने
तन भिजते
जल लहरींचे रुप
सतत बदलते
किनाऱ्याची खासियत
अनुभवातून कळते
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
ठिकाण
प्रदक्षिणा तीर्थ (हरिहरेश्वर)
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com

Comments
Post a Comment