जलयुक्त शिवार कविता ७५



जलयुक्त शिवार

निळ्याभोर आभाळी बघता 
पिंजलेल्या कापसाचं ठिपके
ढगांची मुक्तनक्षी शोभती 
मधीच हिरवेगार झुबके ||

जल अन् नभाची छटा
एकाच रंगात  दिसती 
जलावर पांढरे ठिपके 
मोत्यावाणी  चमकती||

सिमेंट बंधारा साठ्याला आडवी
धरेची जलपातळी वाढवी
शेतीपाण्याचं गणित सोडवी
गावं सुजलाम सुफलाम घडवी||

पाणी आडवूया पाणी जिरवूया
पाणलोट क्षेत्राचा विकास करुया
पावसाचं पाणी गावातच साठवूया 
तुफान आलया,तुफान आलया||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ७५ 
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
 https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड