निसर्ग सौंदर्य कमळगड कविता ६१
वनदुर्ग कमळगड
कोळेश्वर डोंगरावर
रुबाबदार गड
वनराईच्या दाटीत
दिसतोय गड
पायथ्याने चढू कातळवाट
पेडा,नाकाडाणं माथ्यावरी
ओहळ,धबधबे बघत
चंद्रकोरीत भटकंती करी
अवघड चढणवाटेने
कड्याकपारीवर जावू
झाडातल्या जंगलवाटेने
कड्याला वळसा घालू
सौंदर्य न्याहाळत
कड्यावर जावू
वरुनी सभोवती पाहू
निसर्ग मनात साठवू
भटकंतीने वनदुर्ग
बघणं झाले
दुर्गम भागाचे
जनजीवन कळले
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ६१
Comments
Post a Comment