निसर्ग सौंदर्य कविता पावसाळा ६२



🌧️⛈️पावसाळा⛈️🌧️
आजच्या संततधारेने 
पावसाळा वाटला
वाऱ्याच्या वेगाने
पाऊस कोसळला ||

गरजेच्या क्षणी 
अमृत शिंपले
शिवार हसलं
चैतन्य आले ||

आकसलेला पाऊस
 आज कोसळला
 भिजली वसुधा
 मोदहर्ष झाला||

  पाठीच्या रट्टयाला 
 शाबासकी समजूया
 रान शिवार भिजवलं
त्याची कृपा धरुया...||

 कुंद हवा गार गार वारा 
झोंबू लागला अंगाशी 
आज पावसानं भिजवलं
गारवा सजला मनाशी ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

 👆दिनांक ४ व ५ आॅगस्ट २०२० चा पाऊस

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड