गोपाळकाला कविता ५७
गोपाळकाला
सर्वांना दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...
गोविंदा आला
नाचत आला
इमले रचायला
हंडी फोडायला
अमाप उत्साहाचा
थरार करण्याचा
एकीच्या बळाचा
आनंद लुटण्याचा
खेळ बघायला सारे जमले
उनपावसाची धमाल चाले
कान्हा गोविंदा थरावरी गेले
हंडीचं मटकं हाताने फोडले
तालावर बेभान थिरकली
सद्विचाराची हंडी फोडली
चैतन्य ऊर्जा मिळवली
दहीहंडी साजरी झाली
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ५७
Comments
Post a Comment