निसर्ग सौंदर्य वृक्षारोपण कविता ५४
वृक्षारोपण
रोपटं फळांचं लावूया
माती घालून,आळं करुया
त्याची निगा राखूया
त्याच्याशी गप्पा मारुया ||
खाचरात भातशेती
पाणी उली दिसती
रोप डुले वाऱ्यावर
पावसाची आली सर |
शेतंभाताची रानं हिरवीगार
दऱ्याखोरं मैदानं हिरवेगार
लाल लाल वाटेची माती
जपूया आपली नातीगोती |
रोपं लावू या,काळजी घेऊ या
संवर्धन करुन,झाडं बघू या
धरतीला झाडांनी सजवूया
पर्यावरणाचे तोरण बांधूया|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ५४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment