काव्य पुष्प-६०कविता स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा❗
भारताच्या स्वातंत्र्यासाठी धगधगल्या समिधा
बलिदानाची आहुती दिली स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडा
गुलामगिरीच्या जोखाडाच्या शृंखलेतून
मुक्त केले भारताला हौतात्म्य अर्पून
गौरवशाली जाज्वल्याचा देशाभिमान
गाऊ त्यांच्या त्याग अन् शौर्याचे गुणगान
जहाल मवाळ मतवादी
क्रांतिकारी सत्याग्रही
पुरोगामी सुधारणावादी
स्वातंत्र्य मिळविण्या आग्रही
तेरा रंगदे बसंती चोला गात कुर्बानी देणाऱ्या भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना सलाम
क्रांतिची मशाल तेवत ठेवणाऱ्या क्रांतिकारकांना सलाम
स्वातंत्र्याच्या ध्येयाने झपाटलेल्या भूमिगत चळवळीतील समस्त कार्यकर्त्यांना सलाम
सत्याग्रह,स्वदेशी,चलेजाव चळवळीतील समस्त महापुरुषांना सलाम
स्वातंत्र्याचा रणसंग्रामात मर्दूमकी गाजवणाऱ्या सैनिकांना सलाम
देशभक्तीने सीमेवर रक्षण करणाऱ्या समस्त वीरजवानांना सलाम
भारतमातेच्या सपूतांचे गुणगान गाणाऱ्या लोकशाहिर व लोककलाकारांना सलाम...
शेतशिवारात अन्नधान्य पिकविणाऱ्या समस्त किसानांना सलाम....
जय जवान जय किसान जय विज्ञान....
स्वातंत्र्यदिन अभिवादन
वंदे मातरम्
भारत माता की जय.....
काव्य पुष्प ६०
Comments
Post a Comment