गणपती बाप्पा मोरया कविता ६९
गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!
गणपती बाप्पा मोरया
कार्यारंभी पूजती गजाननाला
आनंद उत्साहाच्या बाप्पाला
वाजत गाजत मिरवणुकीला
वाद्यांचा सूर कानी पडला |
पानाफुलांनी तबक सजले
अगरबत्तीचा सुगंध दरवळे
सुवासिक अत्तर शिंपडले
तोरणझालरींनी मंडप सजले |
घरोघरी गणपती आले
नामस्मरणाचे घोष झाले
टाळांच्या गजरात आले
मखरात विराजमान झाले |
टाळीचा ठेका आरतीला धरला
विनवूया संकट विमोचकाला
येऊ दे उधाण हर्षआनंदाला
सुखसमाधान लाभो मनाला |
जीवनाला दे आकार
मानवतेचा दे उकार
मनशांतीचा दे मकार
स्वप्ने कर साकार |
धमाल उत्साह कमी झाला
तरी मनोभावे पुजूया बाप्पाला
कोरोना विघ्न दूर करण्याचं
गाऱ्हाणं घालूया गणेशाला |
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ६९
Comments
Post a Comment