निसर्ग सौंदर्य कविता फुलोरा ५३
☘️रानफुल☘️
पावसाने भिजवली धरणी
बीजांकुरणाने रोपे तरारली
प्रकाश ,जल आणि वाऱ्याने
हसत नाचत संवर्धित झाली ||
पानापानात शोभतो फुलोरा
नाजूक छटेचा निळापांढरा
जसा अंगठीतला माणिकहिरा
गर्दहिरवीगार शोभे वसुंधरा ||
सरावणातील निसर्ग शोभा
फुल झाडोऱ्यात सजली
छोट्यामोठ्या पर्णांची रांगोळी
विलोभनीय दृश्यात बहारली||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment