निसर्ग सौंदर्य कविता ७६
निसर्ग सौंदर्य
डोंगरपाडा
गगनी मेघांची दाटी
ढगांचं पुंजकं फिरती
झोंबणाऱ्या गार वाऱ्याशी
जलधारा बेंबळ करती ||
घनदाट जंगल डोंगरराणी
धरेची देखणी हिरवीपैठणी
सजली नव्या रुपात अवनी
ऊन पावसाचा मासश्रावणी ||
नुकतीच झालीय भात लावणी
खाचरात साठलय चिखलपाणी
वारा,जलधारेची ऐकूया गाणी
खंडीनं पिकूदे धानाच्या गोणी ||
कौलारू घरांची वाडी
नजीकच शेती बाडी
सोबतीला डोंगरदऱ्या
स्वच्छ हवा वाटणाऱ्या||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ७६
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment