निसर्ग सौंदर्य पायथ्याच शिवार कविता ५८
पायथ्याचं शिवार
उंच झाडी बांधावरी
शिवारात तोरण धरी
गर्द हिरवी भातशेती
तृणमूल पाती झळकती
हिरव्यावर लाल छटा
लालचुटुक फुलांची नक्षी
झुडूपाच्या पान काड्यांनी
सजवलीय रांगोळी साक्षी
डोंगराच्या पायथ्याचं
देखणं रुप शिवाराचं
खाचराच्या दाटीचं
कृषी अन्नदात्याचं
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्यपुष्प ५८
Comments
Post a Comment