निसर्ग सौंदर्य श्रावण बहार कविता ६३
कोकणातली शेतीभाती
डोंगर उतारावर वसली
भात वरी नाचणी लावली
तृणपात्यांनी खाचरं बहरली
नेहमीची झाडं बांधावर
तृणमित्रांची वाट बघतात
बदलतं पीक दरसाल
तरी संग हसत नाचतात
गर्द हिरव्यागार रानी
झाडांची तोरणं लटकली
श्रावणातल्या उनपावसानी
पीकं,तरुवेली झळाळली
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ६३
Comments
Post a Comment