निसर्ग सौंदर्य वृक्षारोपण कविता ४६
वृक्षारोपण
थटीमाळावर जमली मुले
रोपण करण्या झाडफुले
वृक्षदिन साजरा करायला
धरतीचं नातं जपायला
हिरव्या रानी पाऊस सडे
मातीत थेंबेथेंबे अमृत पडे
वरंब्यावर रोपटी लावू
ओल्या मातीत बिया लावू
घोषणा साथीने देवूया
मातीत खड्डा करुया
फळांची रोपे लावूया
रोपाला आळी करुया
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ४६
छायाचित्र चार वर्षांपूर्वीचे आहे.
Comments
Post a Comment