माझी भटकंती औंढा नागनाथ ११०











☘️🛕☘️🛕☘️🛕☘️🛕

माझी भटकंती
भाग क्रमांक--११०
धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
सन २०००तिसरा दिवस
🔆 नांदेड व औंढा नागनाथ 🔆
💫〰️💫〰️💫〰️💫〰️  

बारा ज्योतिर्लिंग शिवमंदिरापैकी एक हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील शिवमंदिर.हिंदू धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र. बालाघाट पर्वत रांगेच्या कुशीत वसलेले मराठवाड्यातील प्रसिध्द प्राचीन काळातील मंदिर आहे.प्राचीन काळातील दारुकावन नावाचा प्रदेश होता.मंदिर आवारात छोटी छोटी १२ ज्योतिर्लिंग शिवमंदिरे आहेत.मंदिरावर शिल्पकलेचे उत्कृष्ट कोरीव काम केलेले आहे.उतरत्या कंगोऱ्यांनी चौथऱ्यावर हेमाडपंती पध्दतीचे वास्तूशिल्प आहे.मंदिरा सभोवती तटबंदी असून त्याला चार प्रवेशद्वारे आहेत.मंदिराच्या आतील भागात वर्तुळाकार मंडप ८ खांबांनी तोलून धरला आहे.या खांबावर नक्षीकामात विविध शिल्पे चितारलेली आहेत.नटराज, कैलास पर्वत,अर्धनारीनटेश्वर इत्यादी आहेत.छत घुमटाकार असून अष्टकोनी कलाकुसरयुक्त आहे.मंदिराच्या गर्भागृहात ओणवे होऊन जावं लागतं.तिथं शिवलिंग भूमिगत आहे.तिथं जाऊन मनोभावे दर्शन घेतले.मानसिक समाधान लाभले.मंडपात येऊन थोडावेळ शांतपणे बसलो. नंदीच्या ऐवजी नंदिश्वराचे स्वतंत्र मंदिर आहे.इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
       मग आम्ही पुढील प्रवासाला निघालो.पुढे आमचे नांदेड वरुन माहूरकडे जायचे नियोजन होते.ते अंतर साधारणपणे २००किमी होते.
तिथचं मुक्काम करणार होतो.प्रवासातच एका छानपैकी धाब्यावर डालफ्राय,मिक्सव्हेज आणि रोटी मस्तपैकी खाल्ली.पुढील प्रवास सुरू झाला.दाजींचे गाडी चालविणे कंट्रोल मधे असायचं.त्यांनी यापूर्वी फिरलेला हा रुट होता.त्यामुळे सहसा जास्त चौकशी करावी लागत नव्हती.
        चारच्या सुमारास आम्ही नांदेडला पोहोचलो.एका ठिकाणी चौकशी करून गुरुद्वारा तख्त पहायला निघालो.नांदेड हे ऐतिहासिक शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.मराठी भाषेचे रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे.शीख धर्मियांचे पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र गुुरुद्वार आहे.पाच तख्तापैकी एक आहे.शीखांचे दहावे गुरु  गुरु गोविंद सिंह यांच्या समाधीवर बांधलेला गुरुद्वारा तख्त आहे.इथं सचखंड, रणजीतसिंह यात्री निवास आणि श्री गुरु गोविंदसिंग संग्रहालय आहे.पांढऱ्याशुभ्र रंगछटा आणि सोनेरी कलश आपले लांबूनच लक्ष वेधून घेतो..तख्तमधील सगळीकडे कुतूहलाने पाहत होतो.प्रथमच अशा प्रार्थनास्थळाला भेट देत होतो.

रंगरंगोटी,आखीवरेखीव पणामुळे वास्तू प्रेक्षणिक दिसत होती.शांत आणि प्रसन्न वातावरण होतं.तख्तातील समाधीस्थान पाहून नतमस्तक झालो.सुंदर आणि प्रशस्त तख्त होते.एका वेगळ्या स्थळाला भेट दिल्याचे समाधान वाटले.स्वच्छता व टापटीप होती.पंजाबी भाषेतील भजन व प्रवचनाचा आवाज कानावर येत होता
तदनंतर आम्ही माहूरकडे प्रस्थान केले.नांदेड पासून माहूर अंदाजे १३० किमी होते.साधारणेपणे तीन-चार तासांनंतर आम्ही तिथं पोहचू असं दाजी म्हणाले.आण्णा व जाधव सर म्हणाले,की आपण नऊदहाच्या दरम्यान जिथपर्यंत जाउ तिथं मुक्काम करुया,आज लय प्रवखस झालाय.मग सगळ्यांनी चालेल , तुम्ही म्हणाल तसं,अशी ती ओढली.
आणि आमचा प्रवास चहापाणी घेऊन सुरू झाला.सायंकाळ होत आली होती.रस्तावर वाहनांची वर्दळ बऱ्यापैकी होती.सूर्यास्ताचा नजारा विलोभनीय दिसत होता.वाटेतअभयारण्य लागले होते.त्यामुळे बऱ्यापैकी सोनहिरवी झाडं दिसत होती.विशेषत:सागाची पानगळ व्हायला सुरुवात झाली होती.डोंगररांगेच्या वळणावळणाचा आणि चढउतार करत प्रवास चालला होता.साडेनऊच्या दरम्यान आम्ही माहूरला पोहोचलो. तिथं नव्यानेच बांधलेल्या एमटीडीसी मंडळाच्या पर्यटन निवासात आम्हाला एक प्रशस्त सर्वसोयींनीयुक्त रुम अल्पखर्चात मिळाली.एकदम नीरव शांततेचे ठिकाण होतं.फ्रेश होऊन जेवायला बाहेर पडलो.तेथून मंदिर आणि हॉटेल्स जरा लांब अंतरावर होते. एका हॉटेलमध्ये छान पैकी भोजन केले.पर्यटननिवासात येऊन उद्याच्या नियोजनावर चर्चा केली.सकाळी लवकर श्री रेणुकामाता देवीचे दर्शन घ्यायला जाऊया..
शुभ रात्री

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड