कविता रचना कारंजे ५०


         कारंजं
मनमोहक कारंजे पाहून 
कंटाळा क्षणात घालवी 
आनंदाला आलं उधाण
मनाला  हर्षाने सजवी ||

देहभान हरपून बघत राहती
नवलाईचे कौतुक करु किती 
जलाचे तुषार उंच उडती
सौंदर्य बघण्या सगळे दिसती |

नक्षीदार विद्युत रोषणाई,
जणू  चांदणं सभोवरी
झाडांची छटा हिरवाई,
वेलींची रचना लयभारी ||

नेत्रदीपक दृश्य पाहूनी ,
आनंदाच्या उकळ्या फुटती
कारंज्याला कवेत घेऊनी,
मनोहारी दृश्याला  टिपती ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्यपुष्प ५०

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड