गणपती आरास कविता ७२




इकोफ्रेंडली आरास 
गणपती बाप्पा मोरया 
बाप्पा झाले विराजमान 
गवताच्या कुटीत छान
कळकाची नक्षीदार कमान 
झावळ्यांच्या ठिपक्याची शान||

भिंती गवताच्या ताट्याची 
बांधणी कळकाच्या कांबीची 
छत वाळक्या गवताचे 
पुढं सजले झाप नेच्याचे||

रानातल्या गवत काड्यानं
सजवलीय सुंदर आरास 
हस्तकलेची सुबक साज
खेड्यातल्या घराचा भास||

कुटीवर शोभे भगवी पताका 
ध्यास आपल्या अभिमानाचा 
वैष्णव संप्रदाय प्रतिकाचा 
गणपती उत्सव आनंदाचा ||

धमाल नाही पण उत्साह आहे
मिरवणूक नाही पण शांतता आहे
वाद्यांचा नाद नाही पण सूर आहे 
सजावट नाही पण मदतीचा हातभार आहे ||

बाप्पा कोरोनाचे विघ्न दूर करा 
हीच भक्तीभावाची विनंती तुजला 
पूजन दर्शन आरती करायला 
बाप्पाच्या उत्सवाला जन जमला ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
काव्य पुष्प ७२ 
सजावट श्री गणेश मंडळ गणेशवाडी कोंढावळे 
मागील लेख व कविता वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड