निसर्ग सौंदर्य कविता सांज ६४


जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
❄️ सांज ❄️
नयनरम्य दृश्य तिन्हीसांजेचे
प्रतिबिंब उमटले सोनेरी प्रकाशाचे 
विहंगम दर्शन शेततळ्याचे 
जीवन अमृत पीकांचे ❗
कष्टाच्या घामाची धरा
खोदकामाने बनवले तळे
त्यात बरसती जलधारा .
फुलतील फळाफुलांचे मळे ❗
तांबूस सोनेरी रंग छटेने 
गुलालाने माखले आकाश 
चराचरातील जीवांना मिळतो 
तेजोमय चेतनेचा प्रकाश ❗
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ६४
फोटो साभार श्री गणेश तांबे सर

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड