निसर्ग सौंदर्य कविता रांजणकुंड ६६

 

रांजणकुंड (खळगे)

नदीच्या पात्रात 
प्रवाहित धार 
कातळ खडकाची 
सहनशीलता फार |

पाण्याच्या  संतत वेगाने
झीजला कातळ गोलखोल
साकार होतोय नवाविष्कार 
कुंड रांजणखळग्यांचे अनमोल |

कातळकुंड दिसते भारी 
पाणी फिरते विभोर
कातळाची नक्षी बघूनी 
आनंदला मनीचा मोर |

नवलाईचे कातळशिल्प 
कुकडी नदीच्या पात्रात 
गुळगुळीत कातळ खळगे
नजर वेधूनी घेतात |

कातळ ऐलतीरी पैलतीर
मळगंगा मातेचे मंदिर
भौगोलिक प्राकृतिक खुणा
कातळाचा आविष्कार देखणा |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ६६

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड