कविता गणपती बाप्पा मोरया ६८
सर्वांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गणपती बाप्पा मोरया
ओवाळणी करत
गाऊ तुझी आरती
तुच आहेस समद्या
शुभकार्याचा सारथी |
जाणूया पोलिस,डॉक्टर,नर्स
स्वच्छतारक्षकांच्या सेवेची महती
अभिमानाने कोरोना फायटरशी
जोडूया सामाजिक नातीगोती |
सार्वजनिक सोहळ्यात विराजतो
जाणीव जागृतीचे उपक्रम राबवितो
सामाजिक चळवळ रुजवितो
दानधर्म ,आरोग्यशिबीरं भरवितो|
भक्तगण श्रद्धेने पूजतात
लेझीमचे खेळ खेळतात
तुतारींचा नाद घुमवितो
वाद्यांचा गजर कडाडतो |
तूच कर्ता आणि करविता
आनंद, सुखसमृद्धीचा दाता
बंद होवू दे कोरोनाची वार्ता
तू आहेस सुखकर्ता दुःखहर्ता |
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ६८
बाप्पाची मूर्ती क्रांतिसिंह नाना पाटील गणेशोत्सव मंडळ ओझर्डे वाई
फोटो सौजन्य श्याम विजय तांगडे
Comments
Post a Comment