मैत्री कविता ४७
सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❗🌹💐
🤝 मैत्री🙏🏻
मित्रत्वाचा रंग
विचारांचे तरंग
समजती अंतरंग
रागलोभाच्या संग
एक नातं मैत्रीचं
एक नातं स्नेहाचं
एक नातं मदतीचं
प्रसंगी रागवण्याचं
मैत्री शिकवते हसायला
जीवनातील आनंद लुटायला
नात्यापल्याडची उंची मोजायला
वेदनेची धार कळवळायला
मैत्री दिल,दोस्ती दुनियादारी
निर्मळ भावनांची अविष्कारी
विश्वासाची जपणूक करुया
मैत्रीचे नातं अविरत रुजवूया
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ४७
सर्व ज्ञात,अज्ञात मैत्री परिवारातील सर्वांना काव्यपुष्पाने मनसे,दिलसे हार्दिक शुभेच्छा!!!
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ४७
सर्व ज्ञात,अज्ञात मैत्री परिवारातील सर्वांना काव्यपुष्पाने मनसे,दिलसे हार्दिक शुभेच्छा!!!
Comments
Post a Comment