गणपती उत्सव कविता ७१





गणपती बाप्पा मोरया
गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!
 साठवणीतल्या आठवणी  
   
गणपती उत्सवाची उत्सुकता असायची
आनंद उत्साहाला भरती यायची
आळीतल्या दोस्तांची मिटिंग घ्यायची 
एक-दोन रुपयांनी वर्गणी मिळवायची ||

कुंभार काकांच्या घरी जावून मुर्ती ठरवायचो 
डोक्यावर घेऊन चालत आणायचो  
घरगुती साहित्यातून मंडप उभारायचो 
 साड्यांची आरास करायचो ||

पताका झुरमुळ्या कागदाच्या बनवायचो 
वर्गणी न घेता शेजाऱ्याची लाईट  वापरायचो 
वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढायचो
पुस्तकात बघत आरती म्हणायचो||

लाह्यांची खिरापत वाटायचो 
रात्रीची नाट्यछटा  सादर करायचो
नुसती धमाल मजा उडवायचो
 हातगाडीवरुन मिरवणूक  काढायचो ||

गुलालाची उधळण करायचो
डोक्याला रिबनी बांधायचो
जोरजोरात नामघोष करायचो
टेपच्या गाण्याव धमाल नाचायचो ||
गणपती बाप्पा मोरया....

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
काव्य पुष्प ७१
फोटो प्रतिकात्मक साभार श्रीराम गणेशोत्सव मंडळ, पाटीलवाडी कोंढावळे 
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड