कविता पाऊस पाणी ५१







💧 पाऊसपाणी💧
अंबरी ढग दाटून आले
काजळी घन निनादले 
बक्कळ बरसल्या धारा
ओलीचिंब भिजली धरा❗

धबधबे कड्याखाली आदळले
ओढेनाले वेगे धावत सुटले  
खाचरातील माती लोण्यावाणी 
सजले रे पाय मेंदीवाणी ❗

वापसा आला पेरा करा
कामं उरकू आळी पाळी
शेतावर पाभार धरु
बैलं  जुंपू शिवाळी❗

पाभार शिवारी चाले
फण रेघोटी ओढे
भलरी साद घाले 
चाडं बीज सोडे ❗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे, वाई
मागील लेख व कविता वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
htpps://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड